Thursday, September 04, 2025 11:12:03 PM

अमरावतीमधील नागरिकांचा निवडणुकीवर बहिष्कार

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील आदिवासींना सुविधा नसल्याने त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

अमरावतीमधील नागरिकांचा निवडणुकीवर बहिष्कार

अमरावती : ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमरावती जिल्ह्यातून एक मोठी बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील आदिवासींना सुविधा नसल्याने त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. मेळघाट परिसरातील सहा गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. रंगूबेली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खामदा, किन्हीखेडा, धोकरा, कुंड आणि खोकमार या सहा गावांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.  

अमरावतीच्या मेळघाट परिसरातील सहा गावांचा विधानसभा निवडणुकीवर असणार आहे. सहा गावांमध्ये १ हजार ३०० मतदार आहेत. या सर्व मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. मतदानाच्या दिवशी मेळघाट परिसराती नागरिक मतदान करणार नाहीत असं त्यांनी जाहीर केले आहे. 

अमरावतीच्या रंगूबेली ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या खामदा, किन्हीखेडा, धोकरा, कुंड आणि खोकमार या सहा गावांनी मतदाना दिवशी मतदान न करण्याचा निश्चय केला आहे. पाणी, रस्ता, नाले, वीज अशा मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. केवळ घोषणा होतात मात्र सुविधा मिळत नसल्याचा आरोप देखील येथील ग्रामस्थांनी केला आहे. तसेच आधी सुविधा द्यावी नंतर मतदान करणार असा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे.  


सम्बन्धित सामग्री