Sunday, August 31, 2025 09:30:32 AM

Atal Setu Electric Vehicles : अटल सेतूवर आजपासून इलेक्ट्रिक वाहनांना मोफत प्रवास; राज्यातील या महामार्गांवरही वाहनांना मिळणार टोलमाफी

atal setu electric vehicles  अटल सेतूवर आजपासून इलेक्ट्रिक वाहनांना मोफत प्रवास राज्यातील या महामार्गांवरही वाहनांना मिळणार टोलमाफी

मुंबई : मुंबईबाहेर जलद गतीने जाणारा अटल सेतू मार्ग अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीचा मार्ग बनला आहे. याच मार्गावरील एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवरून मोफत प्रवास करता येणार आहेत. आजपासून इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर टोलमाफी देण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात केलेली घोषणा अटल सेतूवर आता अमलात येणार असून राज्यातील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व समृद्धी महामार्ग या दोन महामार्गावरही येत्या दोन दिवसांत लागू होण्याचे संकेत आहेत.

हेही वाचा : Bail Pola 2025: बैलपोळा सण साजरा करतायं; जाणून घ्या हे महत्त्वाचे निर्देश

ही टोलमाफी राज्य सरकारकडून वाहतूक क्षेत्रातून होणारे कार्बन, प्रदूषणकारी वायू आणि हरित गृह वायू उत्सर्जन रोखण्यासाठी एप्रिल महिन्यात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर करण्यात आले. त्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू आणि समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व चारचाकी इलेक्ट्रिक वाहने आणि बसेसना टोलमाफी जाहीर करण्यात आली होती.


सम्बन्धित सामग्री