Thursday, August 21, 2025 01:33:56 AM

कुर्ल्यातील अनधिकृत मशिदींवर हातोडा ?

कुर्ला येथील अनधिकृत मशिदी आणि भोंग्यांवर महापालिका कारवाई करण्याची शक्यता आहे.

कुर्ल्यातील अनधिकृत मशिदींवर हातोडा

मुंबई : कुर्ला येथील अनधिकृत मशिदी आणि भोंग्यांवर महापालिका कारवाई करण्याची शक्यता आहे. महाालिकेच्या एल प्रभागाच्या अधिकाऱ्यांची अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या नियोजनाबाबत सविस्तर बैठक झाल्याचे वृत्त आहे. मिठी नदी किनाऱ्याचा भाग आणि असल्फा महापालिका उद्यानातील अतिक्रमण तोडण्याबाबत अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. याआधी 
आशियातील एक मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीतील मशिदीच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. या निर्णयाला मुसलमानांनी विरोध केला. महापालिकेच्या कारवाईला आडकाठी करण्यासाठी हजारो मुसलमान रस्त्यावर आले. काँग्रेस नेत्यांनी मुसलमानांची साथ देत महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अडवले. चर्चेतून तोडगा निघाला. मशिदीच्या विश्वस्तांनी लवकरच अनधिकृत बांधकाम स्वतः पाडू असे आश्वासन महापालिकेला दिले. यानंतर महापालिकेच्या कारवाईसाठी आलेलल्या पथकाने त्यांची कारवाई थांबवली. यामुळे कुर्ला येथे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई सुरळीत पार पडेल की समस्या निर्माण होतील, हा प्रश्न अद्याप आहे.


सम्बन्धित सामग्री