Friday, September 12, 2025 10:39:03 PM

Anjana Krishna : 'ही महाराष्ट्राची संस्कृती नाही!'; आयपीएस अंजना कृष्णाच्या त्या व्हायरल फोन रेकॉर्डिंगवर माजी पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फोन संभाषणाचा रेकॉर्डिंग व्हायरल झालेल्या करमाळा तालुक्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

anjana krishna  ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आयपीएस अंजना कृष्णाच्या त्या व्हायरल फोन रेकॉर्डिंगवर माजी पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फोन संभाषणाचा रेकॉर्डिंग व्हायरल झालेल्या करमाळा तालुक्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अजित पवारांसोबतच्या त्या फोन संभाषणानं राज्याच्या राजकारणात आणि पोलीस खात्यात चांगलाच खळबळ माजली होती. अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना थेट आणि स्पष्ट उत्तर दिल्याचे त्या रेकॉर्डिंगमधून समोर आले. त्यानंतर त्यांच्या धाडसी भूमिकेचे कौतुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. विशेष म्हणजे, माजी मुंबई पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांनीदेखील अंजना कृष्णा यांचे कौतुक केले आहे.

हेही वाचा : Income Tax Return: कर सवलत, वजावट आणि सूट, यात फरक काय?; ITR भरताना गोंधळ टाळा, जाणून घ्या कर बचतीचे नियम

या प्रकरणी माजी मुंबई पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी म्हटले आहे की, पोलीस खात्यातील अधिकारी जेव्हा कायदेशीर कारवाई करतात, तेव्हा राजकीय दबाव येणे ही काही नवीन गोष्ट नाही. “राजकीय दबाव असतोच, पण त्याला कसे हाताळायचे हे महत्त्वाचे आहे. अंजना कृष्णा यांनी दाखवलेला धाडसपूर्ण दृष्टिकोन ही त्यांची खरी अग्निपरीक्षा आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्यासोबत DGP, CP आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा उभी आहे,” असे मत  व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले की, “लोकशाहीत कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही पोलीसांची जबाबदारी आहे. राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे. अंजना कृष्णा यांनी दाखवलेले धैर्य ही पोलीस सेवेच्या सन्मानाची बाब आहे.” अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्या संवादामुळे निर्माण झालेली चर्चा आता राजकीय वर्तुळाबरोबरच पोलीस दलातही रंगू लागली आहे. त्यांनी दिलेले समर्थन अंजना कृष्णा यांना नैतिक बळ देणारे मानले जात आहे. 


सम्बन्धित सामग्री