Wednesday, September 03, 2025 10:48:24 AM

जहाल नक्षलवादी चकमकीत ठार

जहाल नक्षलवादी रूपेश मडावी याचा महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.  नक्षलवादी चळवळीत असताना ७० हून अधिक गुन्हे या नक्षलवाद्यावर होते.

जहाल नक्षलवादी चकमकीत ठार
RUPESH MADAVI

२५ सप्टेंबर, २०२४, गडचिरोली : जहाल नक्षलवादी रूपेश मडावी याचा महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.  नक्षलवादी चळवळीत असताना ७० हून अधिक गुन्हे या नक्षलवाद्यावर होते. तसेच, सतत सुरक्षा दलातील जवानांना चकवा देत होता त्यामुळे त्याच्यावर ३ राज्यांत ७५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून ६ किलोमीटर अंतरावर अबुझमाडच्या जंगलात छत्तीसगडच्या सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षली ठार झाले होते. यातील पुरुष नक्षलवाद्याची ओळख पटली असून, तो गेल्या २० वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल चळवळीत सक्रिय आहे. लोकसभा निवडणुकीत नक्षलवाद्यांनी कोठी येथे मतदान केंद्रावर बीजीएलचा मारा केला होता. त्यातही रूपेश मडावीची प्रमुख भूमिका होती. हत्या, जाळपोळ आणि इतर गंभीर गुन्हे रूपेश मडावीवर दाखल करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री