Monday, September 22, 2025 01:55:40 AM

Kareena Kapoor Birthday : करीना कपूरच्या 'या' चित्रपटाने केली बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई

बॉलीवूड म्हटल्यावर आपल्यासमोर येतात ग्लॅमरस अभिनेत्री, मसालेदार सिनेमा आणि दबंग अभिनेता. बॉलीवूडमध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टींबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता असते.

kareena kapoor birthday  करीना कपूरच्या या चित्रपटाने केली बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई

मुंबई: बॉलीवूड म्हटल्यावर आपल्यासमोर येतात ग्लॅमरस अभिनेत्री, मसालेदार सिनेमा आणि दबंग अभिनेता. बॉलीवूडमध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टींबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. गेल्या काही वर्षांत, अनेक नवीन अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. मात्र, काही अभिनेत्री मोजक्याच चित्रपटात काम करून बॉलिवूडला रामराम करतात. मात्र, वर्षानुवर्षे काम करुन आजही अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. त्यापैकी एक आहे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री बेबो अर्थात करीना कपूर. 21 सप्टेंबर रोजी करीना कपूरचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत, करीना कपूरच्या कोणत्या चित्रपटाने केली बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई.

हेही वाचा: Asmita Deshmukh: एका इव्हेंटदरम्यान 'या' अभिनेत्रीची फसवणूक, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती; नेमकं काय घडलं?

करीना कपूरच्या 'या' चित्रपटाने केली सर्वाधिक कमाई

करीना कपूर स्टारर 'बजरंगी भाईजान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली होती. या चित्रपटात करीना कपूर, सलमान खान आणि हर्षाली मल्होत्रा मुख्य भूमिकेत होती, तर नवाजुद्दीन सिद्दीकी, शरत सक्सेना, राजेश शर्मा, मेहेर विज, आदी. कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. बजरंगी भाईजान हा चित्रपट कबीर खानने दिग्दर्शन केला होता. सॅकनिल्क वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, 'बजरंगी भाईजान' चित्रपटाने देशात 320.34 कोटींची कमाई केली. सोबतच, जगभरात 'बजरंगी भाईजान' चित्रपटाने तब्बल 922.03 कोटींची कमाई केली. 

2019 मध्ये करीना कपूरच्या गुड न्यूज चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. गुड न्यूज चित्रपटाने देशात 205.09 कोटींची कमाई केली, तर जगभरात 316 कोटींची कमाई केली. 25 डिसेंबर 2009 रोजी प्रदर्शित झालेल्या करीना कपूरच्या 3 इडिअट्स चित्रपटाने देशात 202.47 कमावले आणि जगभरात तब्बल 460 कोटींची भक्कम कमाई केली. 


सम्बन्धित सामग्री