मुंबईकरांनो, पाण्याची चिंता आता नको! शहराला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे यंदा 99 टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने भरली आहेत. अप्पर वैतरणा, तानसा, मिडल वैतरणा आणि मोडक सागर ही चार प्रमुख धरणे तर पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे पुढील वर्षभर, म्हणजेच जून 2026 पर्यंत मुंबईकरांच्या पाण्याच्या गरजा सहज भागतील.
मुंबईला दररोज सुमारे 4000 दशलक्ष लिटर (MLD) पाणी लागते. त्यातील निम्मा पुरवठा या धरणांतून तर उर्वरित भातसा धरणातून केला जातो. या धरणांतून पाणी गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने थेट भांडुप पंपिंग स्टेशनपर्यंत पोहोचते आणि तेथून शुद्धीकरण करून शहरातील प्रत्येक भागात पाठवले जाते.
हेही वाचा - Nitin Gadkari: 'आरक्षण न मिळणं हेच वरदान' आरक्षण मुद्यावरून नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत
महानगरपालिकेने पाणी व्यवस्थापनासाठी नवे उपाय हाती घेतले आहेत. गळती कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. सिमेंट काँक्रिट रस्त्यांमुळे गळती घटल्याचा अनुभव आला आहे. तसेच 22,000 हून अधिक जलजोडण्या अधिकृत केल्याने पाणी चोरीवर नियंत्रण मिळाले आहे.
हेही वाचा - Mumbai Local : मुंबई लोकलचे आधुनिकीकरण! स्वयंचलित दरवाजांसह नॉन-एसी गाड्याही नव्या रूपात
लोकसंख्येच्या वाढत्या गरजांसाठी गारगाई धरण प्रकल्पालाही गती दिली जात आहे. परवानग्या पूर्ण झाल्यावर या धरणामुळे मुंबईला दररोज 440 MLD अतिरिक्त पाणी मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे भविष्यातील मागणी सहज भागवता येईल. मुंबई महापालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी सांगितले की, “मुंबईकरांनी पाण्याबाबत अजिबात चिंता करू नये. पुढील वर्षभर पाण्याच्या उपलब्धतेवर कोणताही धोका नाही.”