मुंबई : नांदेड जिल्ह्यातील भाजपाचे माजी खासदार आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव खतगावकर आणि त्यांची सून मीनल खतगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश झाला. राज्यात मविआचे सरकार येईल, असा विश्वास काँग्रेस प्रवेशानंतर भास्करराव खतगावकर यांनी व्यक्त केला. भास्करराव खतगावकर यांचा काँग्रेस प्रवेश हा अशोक चव्हाणांसाठी धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.