Sunday, August 31, 2025 07:00:29 AM

पंतप्रधांनांच्या कार्यक्रमस्थळी चिखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी चिखल पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसाने पुण्यात घोळ घातला आहे. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे. ज्या मार्गाने मोदी स्टेजवर जाणार आहे.

पंतप्रधांनांच्या कार्यक्रमस्थळी चिखल
MODI

२५ सप्टेंबर, बुधवार, पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी चिखल पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसाने पुण्यात घोळ घातला आहे. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे. ज्या मार्गाने मोदी स्टेजवर जाणार आहे. त्या मार्गावर आणि मैदानावर सगळीकडे चिखलाचं साम्राज्य पसरलं असल्याचं दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सभास्थळी पाहणी करण्याकरता पोहचले. तेव्हा अजित पवारांनाही चिखलातून वाट काढावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी २६ सप्टेंबर २०२४ रोजी पुणे दौरा आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते भुयारी मेट्रोचे उद्धाटन केले जाणार आहे. तर स्वारगेट ते कात्रज या नव्या मेट्रो मार्गाचे भूमीपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे. या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु आहे मात्र, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर पावसाचे सावंत पाहायला मिळत आहे.  

असा असेल पंतप्रधान मोदींचा दौरा -

संध्याकाळी ५:३५ वाजता - पुणे विमानतळावर आगमन
संध्याकाळी ५:३५ वाजता - शिवाजीनगर येथील मेट्रो स्थानकावर आगमन
शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार
पंतप्रधान मोदी मेट्रोने प्रवास करत स्वारगेटला पोहचतील
संध्याकाळी ६:३० वाजता स प महाविद्यालय येथे सभा


सम्बन्धित सामग्री