भंडारा : राज्यात २३ तारखेला मविआचीच सत्ता येणार असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. सत्ता कोणाची येणार याचा निर्णय जनतेच्या हाती आहे आणि जनतेने त्यांचा निर्णय घेतला आहे, असेही नाना पटोले म्हणाले. राज्यात विधानसभेसाठी बुधवार २० नोव्हेंबर रोजी मतदान आहे आणि मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतदानाला आता एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. या टप्प्यावर नाना पटोलेंनी राज्यात मविआचीच सत्ता येणार असा विश्वास व्यक्त केला.