थर्टीफस्ट सर्वच जण वेगवेगळे प्लॅन करताय. त्यातच आता तळीरामांसाठी एक खुशखबर समोर आली आहे.नवीन वर्ष आणि नाताळनिमित्ताने राज्यातील दारूची दुकाने तसंच पब आणि बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता लक्षात घेऊन परवानगी नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे.
याबाबत सविस्तर..
गृह विभागाच्या आदेशानुसार, 24 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर असे तीन दिवस दारूची दुकानाची वेळ वाढवण्यात आली आहे. दारूची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर पब आणि बार यांना पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारी परवान्यानुसार दारूची दुकाने सुरू ठेवण्याबाबत राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
२१ डिसेंबर रोजी गृह विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आलेय. दारूची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहतील. तर परमीट रूम पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असतील. रात्री साडेदहा वाजता राज्यभरात दारूची दुकाने बंद होतात. पण ख्रिसमस आणि वर्षाअखेरीस मद्यविक्रीची वेळ वाढवण्यात आली आहे.
दरम्यान या काळात पोलिसांचा बंदोबस्त देखील असणार आहे. त्यामुळे तळीरामांना कुठेतरी पोलिसांचा धाक बाळगावा लागणार आहे. पण कुठेतरी सरकारने दारूची दुकाने सुरू ठेवण्याचा वेळ वाढवल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान येऊन ठेपले आहे.