Sunday, August 31, 2025 02:32:38 PM

स्वीडनमध्ये स्क्रीनवर निर्बंध

स्क्रीनच्या अतिरेकामुळे मुलांच्या विचारक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यानंतर स्वीडन सरकारने मुलांच्या स्क्रीन बघण्यावर निर्बंध घातलेत.

स्वीडनमध्ये स्क्रीनवर निर्बंध

स्टॉकहोम : स्क्रीनच्या अतिरेकामुळे मुलांच्या विचारक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यानंतर स्वीडन सरकारने मुलांच्या स्क्रीन बघण्यावर निर्बंध घातलेत. या निर्बंधांमुळे स्वीडनमधील शून्य ते दोन वयोगटातील मुलांच्या मोबाईल आणि टीव्ही बघण्यावर बंदी आली आहे.

मुलांचा वयोगट - निर्बंध

  1. शून्य ते दोन - मोबाईल आणि टीव्ही बघण्यास बंदी
  2. दोन ते पाच - मोबाईल किंवा टीव्ही जास्तीत जास्त एक तास बघता येणार
  3. सहा ते बारा - मोबाईल किंवा टीव्ही जास्तीत जास्त दोन तास बघता येणार
  4. बारा ते सोळा - मोबाईल किंवा टीव्ही जास्तीत जास्त तीन तास बघता येणार

सम्बन्धित सामग्री