मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दररोज मुंबईत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पत्रकार परिषदा सुरू आहेत. विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते दररोज माध्यमांशी संवाद साधत आहेत. महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी १६ नोव्हेंबर रोजी मुंबईचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. ठरलेल्या कार्यक्रमानुसार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम मुंबईचा जाहीरनामा प्रकाशित करणार होते. पण चिदंबरम आले. त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. पण मुंबईचा जाहीरनामा प्रकाशित न करताच ते निघून गेले. अखेर काँग्रेसच्या उत्तर मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईचा जाहीरनामा प्रकाशित केला.