पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी २९ सप्टेंबर रोजी पुणे मेट्रोचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार आहेत. सोलापूर विमानतळाचे लोकार्पण, भिडेवाडा भूमिपूजन, बिडकिन औद्योगिक नोड शुभारंभ हे कार्यक्रम पण मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. याआधी पंतप्रधान मोदी बुधवारी पुण्याचा दौरा करणार होते. पण मुसळधार पाऊस पडल्यामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा आयत्यावेळी रद्द झाला. यानंतर रविवारी मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन आणि लोकार्पणाचे कार्यक्रम करण्याचा निर्णय झाला आहे.