Wednesday, August 20, 2025 05:34:48 PM

शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार

शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दूल सत्तार नापास झाल्याचं समोर आलं आहे.

शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार

महाराष्ट्र : राज्य मंत्री मंडळात समावेश करण्यासाठी शिनसेनेच्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचे प्रगती पुस्तक शिवसेनेनं तयार केले आहे. शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात दोन माजी मंत्री नापास झाल्याचं  देखील समोर आलं आहे .शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दूल सत्तार नापास झाल्याचं समोर आलं आहे. 

त्याचबरोबर शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात मंत्री पदासाठी इच्छुक असणारे 5 आमदार पास झाल्याची माहिती आहे. शिवसेनेचे मंत्री पदासाठी इच्छुक असणारे भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जून खोतकर आणि विजय शिवतारे पास झाले आहेत. महायुतीमध्ये शिवसेनेला 13 ते 14 मंत्री पद मिळणार असल्याची माहीती देखील समोर आली असून या पैकी 10 ते 12 मंत्र्यांना याच आठवड्यात मंत्री पदाची शपथ दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून हाती आली आहे. 

शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात पास झालेले संभाव्य मंत्री

1. गुलाबराव पाटील
2. उदय सामंत
3. दादा भूसे
4. शंभूराजे देसाई
5. तानाजी सावंत
6. दिपक केसरकर
7. भरतशेठ गोगावले
8.संजय शिरसाट
9. प्रताप सरनाईक
10. अर्जून खोतकर
11. विजय शिवतारे
 


सम्बन्धित सामग्री