Wednesday, September 03, 2025 09:03:30 AM

रागिनी MMS २ फेम परवीन डबासचा कार अपघात

बॉलिवूड अभिनेता परवीन डबास कार अपघातात जखमी झाला आहे.

रागिनी mms २ फेम  परवीन डबासचा कार अपघात

मुंबई- बॉलिवूड अभिनेता परवीन डबास कार अपघातात जखमी झाला आहे. नुकतीच अभिनेत्याशी संबंधित ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज सकाळी अभिनेता कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. परवीनची पत्नी प्रीती झांगियानी हिन त्याच्या आरोग्याबाबत माहिती दिली आहे.

वेगवेगळया चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिकांमध्ये दिसलेला बॉलिवूड अभिनेता परवीन डबासला कार अपघातानंतर मुंबईतील वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर हॉस्पिटमध्ये उपचार सुरू आहेत. शाहरुख खानच्या चित्रपटांमध्ये दिसलेली त्याची पत्नी प्रीती हिने त्याच्या तब्येतीचे अपडेट दिली आहे.

महत्त्वाचे मुद्दे -

  • रागिनी MMS २ फेम परवीन डबासचा कार अपघात
  • प्रकृती चिंताजनक
  • ICU मध्ये दाखल


 


सम्बन्धित सामग्री