Friday, September 05, 2025 08:58:32 AM

पनवेलमध्ये रिसॉर्ट, फार्म हाऊस पर्यटकांनी फुल्ल

न्यू इयर सेलिब्रेशनसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमधील हॉटेल, फार्म हाउसेस, रिसॉर्ट्स पर्यटकांनी ओसंडून वाहत आहेत.

पनवेलमध्ये रिसॉर्ट फार्म हाऊस पर्यटकांनी फुल्ल

नवी मुंबई : न्यू इयर सेलिब्रेशनसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमधील हॉटेल, फार्म हाउसेस, रिसॉर्ट्स पर्यटकांनी ओसंडून वाहत आहेत. पनवेल तालुक्यात माथेरानच्या डोंगराच्या पायथ्याशी नेरे, वाजे, धोधाणी, गाडेश्वर, वाकडी आदी गावांसह विविध ठिकाणी अनेक रिसॉर्ट्स व फार्म हाउसेस आहेत. दरवर्षी याठिकाणी न्यू इयर पार्टी एंजॉय करण्यासाठी मुंबई, पुण्यासह विविध ठिकाणाहून पर्यटक येत असतात. त्यामुळे सर्व फार्म हाउसेस पर्यटकांनी फुल्ल झाले आहेत. त्यामुळे येथील हॉटेल व्यवसायिकांमध्ये तसेच स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

पनवेलमधील आगरी कोळी संस्कृतीचे जेवण ही खाद्य संस्कृती आहे. येथील स्पेशल गावरान खाद्यपदार्थ खाण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खवय्ये येत असतात. न्यू इयरचे सेलिब्रेशन करण्यासाठी पनवेल तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील सर्व ढाबे फुल झाले आहेत. न्यू इयर सेलिब्रेशन करताना येथील आगरी कोळी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी खवय्ये पसंती देत आहेत. त्यामुळे स्थानिकांनाही चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा : 31St Special : नववर्ष पार्टीसाठी निमंत्रितांना दिली कंडोम आणि ओआरएसची पाकीटं

मुंबईपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पनवेलच्या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी रिसॉर्ट, फार्म हाऊसकडे पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यातच ख्रिसमस नाताळ च्या सुट्टी पासून ते आता न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी पनवेलच्या रिसॉर्ट व फार्म हाऊसेसवर मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने आयोजकांकडून विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम तसेच मेजवान्यांची पर्वणी आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक देखील आनंद लुटताना दिसत आहेत.


सम्बन्धित सामग्री