Thursday, August 21, 2025 07:09:48 PM

शंख वाजवण्याचं धार्मिक महत्त्व आहेच; शिवाय, आरोग्यालाही होतात इतके फायदे! नक्की शिकून घ्या..

अनेकांना शंख वाजवता येतो. मात्र, तो अनेकदा तो नियमितपणे वाजवला जात नाही. तुम्हाला शंख वाजवता येत नसेल, तर हे फायदे समजल्यानंतर तुम्ही तो नक्की वाजवायला शिकायला सुरुवात कराल.

शंख वाजवण्याचं धार्मिक महत्त्व आहेच शिवाय आरोग्यालाही होतात इतके फायदे नक्की शिकून घ्या

Conch Shell Blow : शंख वाजवणे सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. शंख वाजवण्याला धार्मिक विधींमध्ये खूप महत्त्व आहे. विविध देव-देवतांच्या पूजन-अर्चन तसेच, रोज घराघरांमध्ये होणाऱ्या देवपूजेतही शंखाची पूजा करणे आणि शंख वाजवणे याला खूपच पवित्र मानले जाते. सनातन धर्मात शंख हे महाविष्णूच्या हातातील एक आयुध मानले जाते. यामुळे याला पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. धार्मिक महत्त्व असण्यासोबतच शंख वाजवण्याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात.

शंख वाजवण्याचे फायदे
शंख वाजवणे आरोग्यासाठी उत्तम आहे. याचे अनेक फायदे आहेत. अनेकांना शंख वाजवता येतो. मात्र, तो अनेकदा तो नियमितपणे वाजवला जात नाही. तुम्हाला शंख वाजवता येत नसेल, तर हे फायदे समजल्यानंतर तुम्ही तो नक्की वाजवायला शिकायला सुरुवात कराल. तसेच, नियमितपणे शंख  वाजवण्याविषयी जागरूक बनाल. तर बघू रोज शंख वाजवण्याचे काय फायदे आहेत. 

 स्नायू मजबूत होतात 
शंख वाजवणे मूत्र पथ, मूत्राशय, पोटाचा खालील भाग, डायाफ्राम, छाती आणि मानेच्या स्नायूंसाठी उत्तम ठरतं. याने या सर्व अंगांचा व्यायाम होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याने गुदाशयाचे स्नायू मजबूत होतात. यामुळे याच्याशी संबंधित व्याधींमध्ये आराम मिळतो आणि उपचार सुरू असतील तर, त्याचा अधिक चांगला उपयोग होऊन लवकर गुण येण्यास मदत मिळेल.

हेही वाचा - काकाशी भांडण करण्यामुळे शनिदेव होतात नाराज! फक्त एवढं करा.. मग काही अडचण येणार नाही

फुफ्फुसाच्या स्नायूंचा विस्तार होतो
फुफ्फुसं निरोगी ठेवण्यासाठी व फुफ्फुसाच्या स्नायूंचा विस्तार होण्यासाठी शंख वाजवण्याचा खूप उपयोग होतो. याच्यामुळे श्वास घेण्याची क्षमताही वाढते. शंख वाजवण्याने प्रोस्टेट क्षेत्रावर दबाव पडतो आणि याने प्रोस्टेटचं स्वास्थ्य सुधारतं. हे प्रोस्टेटसंबंधी आजारांमध्ये याचा उपयोग होतो.

थायरॉईड ग्रंथीत सुधारणा
शंख वाजवल्याने थायरॉईड ग्रंथी आणि स्वरयंत्राचा व्यायाम होतो. यांच्याशी संबंधित समस्यांमध्ये याचा फायदा होतो.

बोलण्यात स्पष्टता
यामुळे आपल्या बोलण्यात स्पष्टता येते आणि बोलण्यासंबंधी समस्या दूर होतात. बोबडे बोलणार्‍या मुलांना शंख वाजवायला हवा. याने त्यांची वाणी सुधारेल.

सुरकुत्या दूर होतात
शंख वाजवताना चेहर्‍याचे स्नायू खेचले जातात याने फाईन लाइन्स आपोआप दूर होण्यात मदत मिळते. वाढत्या वयासोबत त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या याच्यामुळे कमी होतात किंवा वेगाने येत नाहीत.

त्वचा रोग दूर होतात
रात्र भर शंखामध्ये पाणी भरून ठेवावे. सकाळी या पाण्याने शरीरावर मालीश करावी. याने त्वचेसंबंधी रोग दूर होतात.

हेही वाचा - मुस्लीम असूनही नुसरतने केलं 16 शुक्रवारचं व्रत! केदारनाथ-बद्रीनाथलाही गेली.. म्हणते, 'माझ्या आतला आवाज..'

ताण दूर होतो
शंख वाजवल्याने डोक्यातील सर्व विचार दूर होतात आणि ताण कमी होण्यात मदत मिळते. तसेच, शंख वाजवण्याचा मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो.

नकारात्मकता दूर होते
शंख वाजवताना त्यातून ऊँ ध्वनी बाहेर पडतो. ज्याने नकारात्मकता दूर होऊन घरात सकारात्मकता पसरते.

हार्ट अटॅकपासून बचाव
नियमित शंख वाजवणार्‍यास हार्ट अटॅकचा धोका खूप कमी होतो. शंख वाजवल्याने सर्व ब्लॉकेजही दूर होण्यास किंवा कमी होण्यास मदत होते.

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री