Sunday, August 31, 2025 06:10:38 AM

Team India Title Sponsor: टीम इंडियाच्या जर्सीवर दिसणार 'या' मोठ्या कंपनीचे नाव; बीसीसीआय घेणार हा मोठा निर्णय

आशिया कप 2025 सुरु होण्याच्या थोड्याच आधी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डासमोर मोठे स्पॉन्सरशीपचे संकट उभे ठाकले आहे. नुकतच केंद्र सरकारकडून ऑनलाईन मनी गेम्सवर बंदी घालण्यात आली आहे.

team india title sponsor टीम इंडियाच्या जर्सीवर दिसणार या मोठ्या कंपनीचे नाव बीसीसीआय घेणार हा मोठा निर्णय

Team India Title Sponsor: आशिया कप 2025 सुरु होण्याच्या थोड्याच आधी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डासमोर मोठे स्पॉन्सरशीपचे संकट उभे ठाकले आहे. नुकतच केंद्र सरकारकडून ऑनलाईन मनी गेम्सवर बंदी घालण्यात आली आहे. या कायद्यामुळे टीम इंडियाचा विद्यमान टायटल स्पॉन्सर ड्रीम-11 ने माघार घेतली आहे. बोर्ड आणि ड्रीम- 11 यांच्यातील करार मध्येच रद्द झाला आहे आणि यापुढे अशा कंपन्यांबरोबर कोणताही करार होणार नाही. अशा परिस्थितीत आता बीसीसीआयसमोर आशिया कपपूर्वी नवीन स्पॉन्सर शोधण्याचं संकट उभं राहिलं आहे.  बीसीसीआय पुढे आता नवीन बीसीसीआय शोधण्याचं आव्हान आहे. 

ड्रीम-11 सोबतचा करार रद्द
आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणर आहे. या स्पर्धेच्या अवघ्या दोन आठवडे आधी बीसीसीआय आणि ड्रीम-11 यांच्यातील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2023 पासून हा करार सुरु असून तो तीन वर्षांसाठी होता. म्हणजेच हा करार 2026 पर्यंत होता. मात्र तो कालावधी संपण्याच्या एकवर्षी आधी करार रद्द करण्यात आला आहे. नव्या ऑनलाईन गेमिंग कायद्यामुळे ड्रीम-11 कंपनीला या डीलमधून माघार घ्यावी लागली आहे. यानंतर अशा कंपन्यांशी कोणताही करार शक्य नसल्याचे बीसीसीआयने स्पष्टपणे सांगितले. 

हेही वाचा: Mirabai Chanu : मीराबाई चानूनं 2026 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत मिळवलं स्थान; या स्पर्धेत केली सुवर्णपदकाची कमाई

बीसीसीआयच्या निर्णयाचा थेट परिणाम असा होणार की, आशिया कपमध्ये टीम इंडिया कदाचित स्पॉन्सरशिवाय मैदानात उतरेल. दरम्यान जगप्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी टोयोटाने टीम इंडियाच्या स्पॉन्सरशीपमध्ये रस दाखवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टोयोटा ही जपानी कार कंपनी भारतीय संघाची टायटल स्पॉन्सर बनण्यास इच्छुक आहे. ही कंपनी भारतात टोयोटा किर्लोस्कर या नावाने कार्यरत आहे. तसेच आर्थिक वर्षात  कंपनीने 56,500 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. 

बीसीसीआयने काय निर्णय घेतला? 
टोयोटासारख्या मोठ्या कंपनीने रस दाखवल्यानंतर बीसीसीआयकडून विचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतच टोयोटा कंपनीने इंग्लंड क्रिकेट संघाची टायटल स्पॉन्सरशीप स्वीकारली होती. तर याआधी ऑस्ट्रेलियन टीमशी जोडली होती. वृत्तानुसार, टोयोटाव्यतिरिक्त आणखी एक मोठी फिन-टेक कंपनी देखील भारतीय संघाशी जोडण्याची इच्छा व्यक्त करत आहे, मात्र त्या कंपनीचे नाव गुलदस्त्यात आहे. 

 


सम्बन्धित सामग्री