Monday, September 01, 2025 04:47:59 PM

पर्यटनाच्या नव्या ट्रेंडसाठी पर्यटक खवणे बीचकडे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा नवा ट्रेंड अनुभवण्यासाठी अनेक पर्यटकांची पावले खवणे बीच खाडीतील कांदळवनकडे वळत आहेत.

पर्यटनाच्या नव्या ट्रेंडसाठी पर्यटक खवणे बीचकडे

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा नवा ट्रेंड अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक यांची पावले खवणे बीच खाडीतील कांदळवनकडे वळत आहेत. कांदळवन मधून खाडी सफर करतानाच नैसर्गिक फिश पेडीक्योर म्हणजेच फिश स्पा याचा अनुभव पर्यटक घेत आहेत.त्याच बरोबर बारामाही वाहणाऱ्या धबधब्यातील पाण्यात वेगळा अनुभव घेत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

केरळमध्ये मोठ्या प्रमाणात कृत्रिम पाण्यात मासे सोडून फिश स्पा म्हणजेच फिश पेडिक्युअर चा आनंद घेतला जातो यापासून पायातील टॉक्सिन काढण्याचा अनोखा उपाय केला जातो मात्र खवणे येथील खवनेश्वर धबधब्याच्या ठिकाणी वाहणाऱ्या नैसर्गिक पाण्यात असणारे मासे हे नैसर्गिक रित्या फिश स्पा चा अनुभव करून देतात आणि सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक याचाच अनुभव घेताना दिसत आहेत. धबधबा हा केवळ पावसातच अनुभवता येतो मात्र येथे वाहणारा बारामाही धबधबा याचा आनंद ही पर्यटक घेत आहेत..

हेही वाचा : 'या' शहरात 31 डिसेंबरला करण्यात येणार खास व्यवस्था

येथे निसर्गाच्या सानिध्यात पर्यटक घरगुती पद्धतीत राहण्याचा व जेवनाचा आनंद घेतात.

पेडिक्युअर म्हणजे काय?

आजकाल त्वचेच्या अनेक समस्या जाणवत असतात. धूळ, प्रदूषण आणि सुर्यप्रकाश यामुळे स्किन टॅन होते. पाय, हात कोपरे मानही काळवंडते. मुख्य म्हणजे चपलांमुळे पायाला चप्पलचे डाग पडतात. पायांचे टॅनिंग काढण्यासाठी पेडीक्योर केले जाते.  

फिश पेडिक्युअर म्हणजे काय?

 बऱ्याच वेळा पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर केले जाते. पण लोक पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर करण्यापेक्षा फिश पेडिक्युअरला पसंती देतात. फिश पेडिक्युअर ही एक प्रकारची थेरपी आहे. ज्यामध्ये लहान मासे मृत त्वचा काढून टाकायचे काम करतात. पण फिश पेडिक्युअर करताना काळजी घेणे गरजेचे असते. यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींची काळजी न घेतल्यास त्वचा आतून खराब होते. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम लवकर होत असतील तर फिश पेडिक्युअर करणे टाळा.

 

 


सम्बन्धित सामग्री