Monday, September 08, 2025 02:03:48 PM

Kashi Vishwanath मंदिराच्या पुजाऱ्यांना मिळणार राज्य कर्मचाऱ्यांचा दर्जा; 200 टक्के पगारवाढीसह वेतन होणार 90 हजार

तब्बल 40 वर्षांनंतर मंदिराच्या कर्मचारी सेवा नियमांना हिरवा कंदील देण्यात आला आहे. पुजारी, कर्मचारी आणि सेवादारांच्या नियुक्तीसाठी प्रस्तावित नियमांमध्ये चार श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत.

kashi vishwanath मंदिराच्या पुजाऱ्यांना मिळणार राज्य कर्मचाऱ्यांचा दर्जा 200 टक्के पगारवाढीसह वेतन होणार 90 हजार

वाराणसी : प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराच्या (Kashi Vishwanath Temple) पुजाऱ्यांच्या संबंधातील एक मोठी बातमी आहे. लवकरच त्यांना राज्य कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळेल आणि त्यांचे पगार तीन पटींनी वाढतील. तब्बल 40 वर्षांनंतर कर्मचारी सेवा नियमांना हिरवा कंदील देण्यात आला आहे. गुरुवारी काशी विश्वनाथ मंदिर विश्वस्त परिषदेच्या 108 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विभागीय आयुक्त एस. राजलिंगम म्हणाले की, पुजाऱ्यांना सध्या 30 हजार रुपये पगार मिळत होता. आता त्यांना 80 ते 90 हजार रुपये पगार मिळू लागेल. नियम लागू झाल्यानंतर पदोन्नती, रजा आणि इतर सुविधांसह वेतन भत्त्यात वाढ होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारी, कर्मचारी आणि सेवादारांच्या नियुक्तीसाठी प्रस्तावित नियमांमध्ये चार श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत. राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच पुजाऱ्यांनाही श्रेणी आणि मॅट्रिक्स दिले जातील.

हेही वाचा - Ganpati Visarjan 2025: ढोल- ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि भक्तांचा उत्साह; मुंबई-पुण्यात जल्लोषात गणरायाला निरोप

दोन डझन प्रस्तावांना मंजुरी
बैठकीत परिषदेने विशालाक्षी कॉरिडॉरचे बांधकाम, डिजिटल संग्रहालयाची स्थापना आणि इतर विकासकामांनाही मान्यता दिली आहे. विभागीय आयुक्त एस. राजलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्मचारी सेवा नियमांसह सुमारे दोन डझन प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

राज्य सरकारने 1983 मध्ये ते अधिग्रहित केले होते
श्री काशी विश्वनाथ मंदिर 1983 मध्ये राज्य सरकारने अधिग्रहित केले होते. तेव्हापासून आतापर्यंत सेवा नियम बनवता आले नाहीत. याबाबत अनेक प्रयत्न झाले. परंतु, प्रकरण कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचले नाही. संविधानाच्या आर्टिकल 201 अंतर्गत 13 ऑक्टोबर 1983 रोजी काशी विश्वनाथ मंदिर कायदा लागू करण्यात आला.

हेही वाचा - Ganesh Idol Ritual : गणेश चतुर्थीला स्थापन केलेली मूर्ती कायमस्वरूपी घरात ठेवू शकतो का? शास्त्र काय सांगतं, जाणून घ्या


सम्बन्धित सामग्री