Sunday, August 31, 2025 04:55:02 PM

मस्साजोग सरपंच हत्याप्रकरणी फरार आरोपी वाल्मिक कराडचे लोकेशन ट्रेस

वाल्मिक कराडचे शेवटचे लोकेशन उज्जैन, फरार आरोपींच्या बँक खात्यांसह पासपोर्ट रद्द

मस्साजोग सरपंच हत्याप्रकरणी फरार आरोपी वाल्मिक कराडचे लोकेशन ट्रेस

बीड :  जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. या प्रकरणी अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, फरार आरोपी वाल्मिक कराड याच्याबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.

11 डिसेंबर 2024 रोजी वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर तो फरार झाला. वाल्मिकने 11 डिसेंबरला उज्जैनमध्ये महाकालेश्वराचं दर्शन घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्याचं मोबाईल लोकेशन आणि सोशल मीडिया पोस्ट्सवरून हे स्पष्ट झाले की, तो त्या वेळी मध्यप्रदेशात होता. त्याने देवदर्शनाचे काही फोटो पोस्ट केले होते. मोबाईल 13 डिसेंबरपर्यंत सुरू होता, मात्र त्यानंतर तो बंद झाला आणि त्याचा शोध लागलेला अजूनही नाही.

कराडचे बँक खाते आणि पासपोर्ट केले रद्द :
संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपींचे बँक खाते गोठवण्याची आणि त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपींचा देशाबाहेर पळून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. वाल्मिक कराड लवकरच सरेंडर करेल, कारण त्याच्या पळण्याची शक्यता आता कमी झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात या नवनवीन खुलाशांमुळे आता अनेक नवीन तपास सुरू करण्यात आले आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून आरोपींचा शोध घेण्याचे काम तेजीत सुरू आहे.

हे देखील वाचा : पुणे रेल्वे स्थानकावर 4 दिवस प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद


सम्बन्धित सामग्री