बीड : खंडणी मागणीच्या गुन्ह्यातील आरोपी आणि बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ठपका असलेला वाल्मिक कराड याने न्यायालात याचिका दाखल केली आहे. झोपेसंबंधी आजार असल्याचा दावा कराडने न्यायालयाकडे केला आहे. सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस द्यावी अशी मागणी कराडने न्यायालयाला केली आहे. परंतु वाल्मिक कराडची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. खाजगी व्यक्तीकडून वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी त्याने याचिका दाखल केली होती. मात्र एखादा खाजगी व्यक्ती कोठडीत असलेल्या आरोपीसोबत ठेवता येणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
झोपेमध्ये श्वास घेताना त्रास होत असल्याने वाल्मिक कराडला ऑटोकॅप मशीन लावावी लागते. केज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये वाल्मिक कराडच्या वकिलांनी अर्ज दाखल केला. मात्र न्यायालयाने सीआयडीला शासकीय वैद्यकीय सुविधा देण्याचे सुचविले आहे.
मदतनीस देण्याची कराडची मागणी
वाल्मिक कराडकडून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडने त्याला स्लिप एपनिया नावाचा आजार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मशीन चालवण्यासाठी सीआयडी कोठडीत मदतनीस देण्याची मागणी कराडने केली आहे.
हेही वाचा : Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींना 2100 रूपये कधी मिळणार?
स्लिप एपनिया आजार नेमका काय?
स्लिप एपनिया हा आजार गंभीर आहे. या आजारामुळे व्यक्तीचा झोपेच्या दरम्यान श्वास थांबतो. यामुळे थकवा आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते.
स्लिप एपनिया आजाराचा धोका कोणाला होऊ शकतो?
काही वेळा स्लिप एपनिया हा आजार अनुवांशिकतेने येतो. जोरात घोरणाऱ्या व्यक्तींमध्ये हा आजार येण्याची शक्यता असते. जास्त वजन असणाऱ्या व्यक्तींध्येही हा आजार बळावू शकतो.