Wednesday, September 03, 2025 02:37:50 PM

परभणीत पतीने पत्नीला का पेटवले?

वारसासाठी वंशाला दिवा असावा म्हणून मुलीला 'नकोशी' म्हणणाऱ्या पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले आहे

परभणीत पतीने पत्नीला का पेटवले

परभणी : वारसासाठी वंशाला दिवा असावा म्हणून मुलीला 'नकोशी' म्हणणाऱ्या पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले आहे. उपचारा दरम्यान पत्नीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी  कुंडलिक काळे याला अटक केली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. परभणीत घडलेल्या या क्रुर घटनेने संताप व्यक्त केला जातोय.

हेही वाचा : धस यांनी माझी माफी मागावी; प्राजक्ताने सोडले मौन

 

काय आहे प्रकरण?

परभणीतील गंगाखेड नाका परिसरात ही घटना घडली. कुंडलिक काळे पत्नी मैनासह येथे राहत होता. मैनाला तिसऱ्यावेळी मुलगी झाल्याने पती-पत्नीत वाद झाला. कुंडलिक पत्नीला शिवीगाळ करून मारहाण करायचा. भांडणाच्या रागात कुंडलीक याने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले. पेटलेल्या अवस्थेत पत्नीने बचावासाठी धावा केला. तिला वाचवायला कोणीही पुढे आले नाही, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. त्यानंतर उपचारासाठी मैनाला दवाखान्यात घेऊन जाण्यात आले. उपचारादरम्यान मैना काळेचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी कुंडलिक काळेला अटक केली. मैनाने स्वतःच्या बचावासाठी घराबाहेर धाव घेतली, मात्र त्यावेळी त्यांना वाचवण्यासाठी कोणीही पुढे आला नाही. बचावासाठी ती समोरील दुकानात शिरली असता दुकानातील साहित्य पेटले.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

तिसऱ्यांदा मुलगी झाली म्हणून पत्नीला जिवंत जाळणाऱ्या या संतापजनक घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.


सम्बन्धित सामग्री