Sunday, August 31, 2025 11:25:24 AM

छठपूजेसाठी गावी गेलेले मतदानाला परतणार का?

छठपूजेसाठी गावी गेलेले उत्तर भारतीय मतदानासाठी महाराष्ट्रात परतणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

छठपूजेसाठी गावी गेलेले मतदानाला परतणार का

मुंबई : दिवाळी आणि छठपूजेसाठी महामुंबईतून रेल्वेने उत्तर भारतात आपल्या मूळ गावी गेलेल्या सुमारे ६१ लाख लोकांना आता परतीचे वेध लागले आहेत; परंतु, ते २० तारखेपूर्वी परतले नाही तर त्यांना मतदानाला मुकावे लागेल. लाखो उत्तर भारतीय महाराष्ट्रात स्थायिक झाल्याने ते राज्याचे मतदार आहेत. मुंबईत उत्तर भारतीय मतदारांचा प्रभाव अनेक मतदारसंघांमध्ये आहे.

महाराष्ट्रात मतदानाला अवघे नऊ दिवस उरले आहेत. निवडणुकीचा प्रचारही जोरात सुरू आहे; परंतु इतक्या कमी कालावधीत लाखो उत्तर भारतीयांना मतदानाआधी राज्यात परत आणणे कठीण असल्याचे सांगितले जाते. रेल्वेच्या आकडेवारीनुसार १ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत मध्य आणि पश्चिम रेल्वेने मुंबई विभागातील ६१ लाख २७ हजार ९६० लोक उत्तर भारतात गेले आहेत. गावी गेलेल्यांना परत आणण्यासाठी रेल्वेला अधिकाधिक अनारक्षित विशेष गाड्या चालवाव्या लागणार आहेत.
 


सम्बन्धित सामग्री