Children Can't Handle Mother's Anger : मुलांना चांगल्या सवयी शिकवण्यासाठी आणि त्यांना शिस्त लावण्यासाठी, पालकांना कधीकधी त्यांना रागावणे भाग पडते. पण ही फटकार मुलांच्या निष्पाप मनावर खोलवर परिणाम करू शकते. विशेषतः जेव्हा रागावणारी व्यक्ती आई असते, तेव्हा मूल खूप दुःखी होते. कारण आई ही मुलासाठी सर्वात जवळची आणि सुरक्षित जागा असते आणि मूल तिचा राग सहन करू शकत नाही.
मुलांसाठी, त्यांची आई त्यांचे संपूर्ण जग असते. त्यांना तिच्याशिवाय क्षणभरही राहण्याची अगदी कल्पनाही मुलांना नको असते. आईच्या मांडीवर झोपणे, तिचा आवाज, तिचे हास्य, या सर्व गोष्टी मुलांना सुरक्षित, प्रेमळ आणि सुरक्षित वाटतात. अशा परिस्थितीत, जरी तीच आई मुलाच्या कल्याणासाठी रागाच्या भरात काही कटू गोष्टी बोलली किंवा त्यांना फटकारले तरी मुले हे सर्व सहन करू शकत नाहीत. कारण, मुलांना चांगल्या सवयी किंवा शिस्त यांची स्वतःहून जाणीव नसते. त्यांच्या बालमनाला आई आपल्यावर रागावली आहे, इतकेच समजते. अनेकदा त्यांना त्यांचे काय चुकले, हे समजलेले नसते. तेव्हा प्रसंगानुसार, रागावण्यापेक्षा समजावणे अधिक योग्य ठरते.
हेही वाचा - Cancer fighting fruit : 'हे' आहेत किवी खाण्याचे फायदे; कॅन्सरचा धोकाही कमी होतो!
प्रत्येक लहान-सहान गोष्टींत वारंवार रागावण्यामुळे मुले आतून दुःखी होतात. आईच्या रागामुळे मुलांमध्ये अपराधीपणा, लाज आणि लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे, यासाठी प्रयत्न करणे आणि वाहवा मिळवण्यासाठी कृती करणे अशा प्रवृत्ती जन्म घेतात. हे शक्य न झाल्यास ज्या इतर मुलांचे कौतुक केले जात आहे, त्यांचा दुस्वास करण्याची प्रवृत्तीही मुलांमध्ये जन्म घेऊ शकते. तर, कधीकधी ही मुलं बालपण सोडून अकाली प्रौढ होण्याची शक्यता असते. चला, याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया.
भावना तुटू लागतात, भावनिक विश्वास तुटू लागतो
आई रागावल्यामुळे मुलाला असे वाटते, की जी माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते ती माझ्याकडे दुर्लक्ष का करत आहे किंवा मला का दुखावत आहे?त्यामुळे मुलाचा भावनिक विश्वास का तुटू लागतो. तेव्हा वारंवार लहान-सहान गोष्टींवर रागावणे टाळावे आणि समजावून सांगण्यावर भर द्यावा. अनेकदा यासाठी वेळ द्यावा लागतो. पण अनेकदा तेवढा वेळ नसल्यास रागावण्याचा सोपा पर्याय अवलंबला जातो. मात्र, यामुळे बऱ्याच काळासाठी मुलांच्या मनावर परिणाम होतो.
लोकांकडून नेहमी कौतुक व्हावे, याचा दबाव
लोकांनी आपल्याला 'गुड गर्ल' किंवा 'गुड बॉय' म्हणावे, यासाठी प्रयत्न करू लागतात. कोण आपल्याला काय म्हणेल याचे ओझे त्यांच्या मनावर येते. ते स्वतःला काय आवडते किंवा 'आपला नैसर्गिक कल काय' याचा विचार करण्याऐवजी लोकांच्या नजरेतून स्वतःला पारखू लागतात. मूल त्याला कसे वाटते, ते देखील दुर्लक्ष करू लागते आणि हा भावनिक संबंध त्याच्या भविष्यातील नातेसंबंधांमध्ये देखील दिसून येतो. म्हणून, आईने याची काळजी घेतली पाहिजे.
लोकांना आनंद देण्याची प्रवृत्ती विकसित होते
अनेकदा मुलाला असेही वाटू लागते की, 'जर मी चांगला आहे, असे इतरांना वाटले, तरच मला प्रेम मिळेल.' या विचारसरणीने, लोकांना आनंद देण्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये विकसित होऊ लागते. म्हणून, आईचे प्रेम नेहमीच बिनशर्त असले पाहिजे. मात्र, याचा अर्थ चुकांवर रागावूच नये, असा होत नाही. पण रागावताना 'लोक काय म्हणतील' हा दृष्टिकोन शक्यतो टाळावा.
मूल स्वतःला दोष देऊ लागते
सतत रागावण्यामुळे काही वेळा मूल स्वतःला दोष देऊ लागते. ते स्वतःला 'मी वाईट आहे' असे समजायला लागू शकते. यामुळे त्याच्यात अपराधीपणाची आणि लज्जेची खोल भावना निर्माण होते, जी कालांतराने चिंता किंवा भीतीमध्ये बदलू शकते. तसेच, याचा मानसिक दबाव तयार होतो. ही बाब अनेकदा सुरुवातील लक्षात येत नाही. पण याचे दूरगामी परिणाम होऊन मुलांचा आत्मविश्वास ढळू शकतो. याचा पुढील जीवनात वाईट परिणाम होतो.
हेही वाचा - सूर्यस्नानानंतर आता 'वनस्नाना'चा ट्रेंड वाढतोय.. तुम्हाला माहीत आहेत का याचे फायदे?
(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीच्या आधारे दिली आहे. अधिक माहितीसाठी किंवा उपचारांची गरज असल्यास तज्ज्ञांशी संपर्क साधावा. जय महाराष्ट्र याची जबाबदारी घेत नाही.)