Bag Packing Before Going to The Hospital for Delivery: बाळाची चाहूल हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. गोड बातमीसोबत सगळं घर फुलून उठतं. होणाऱ्या आईसाठी घरातला प्रत्येक जण काळजी करत असतो. तिच्या आवडीचे काही खास पदार्थ तयार केले जातात. आपापल्या पद्धतीने सर्वच जण काही ना काही योगदान देत असतो. असं करता-करता बाळाच्या आगमनाची वेल जवळ येऊन ठेपते..
अशा वेळेस हॉस्पिटमध्ये जाण्यासाठी निघताना अचानक घाई-गडबड उडू नये, म्हणून काही गोष्टींची आधीच तयारी करून ठेवली पाहिजे. यामध्ये होणाऱ्या आईला आणि येणाऱ्या चिमुकल्या बाळाला लागणाऱ्या वस्तू पॅक करून बॅग तयार ठेवणे आवश्यक आहे. दिवस पूर्ण भरण्याआधीच होणाऱ्या प्रसूतीवेळी तर अधिकच धावपळ उडते. तेव्हा, सर्व शक्यतांचा विचार करून किमान काही वस्तू तरी तयार ठेवाव्यात.
डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाताना काही गोष्टींची तयारी करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या बाळाला कोणताही त्रास होऊ नये.
हेही वाचा - घोरणे कमी करण्यासाठी 'मॅग्नेट नोज क्लिप' वापरणे ठरू शकते घातक , जाणून घ्या कसे
आईसाठी आवश्यक गोष्टी:
कपडे: डिलिव्हरीची तारीख जवळ आल्यानंतर अंगाला घट्टबसणारे कपडे वापरू नका. तसेच, बॅगेतही आरामदायक आणि ढीले कपडे ठेवा. कपडे घ्या. डिलिव्हरीनंतर घालण्यासाठी काही जास्तीचे कपडे ठेवा. फिडिंग गाऊन किंवा फिडिंग ड्रेस हवे असतील तर आधीच खरेदी करून ठेवा.
पर्सनल केअर: नेहमीची औषधे, टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, शॅम्पू आणि इतर आवश्यक वस्तू घ्या.
कागदपत्रे: तुमचे ओळखपत्र, हॉस्पिटलची कागदपत्रे आणि असेल तर विमा पॉलिसी सोबत ठेवा.
मोबाइल आणि चार्जर: कुटुंबीयांशी आणि मित्रांशी संपर्क ठेवण्यासाठी मोबाइल आणि चार्जर सोबत घ्या.
स्नॅक्स आणि पाणी: हॉस्पिटलमध्ये असताना भूक लागल्यास किंवा तहान लागल्यास खाण्यासाठी काही पचायला हलके असलेले पदार्थ आणि पाणी सोबत ठेवा.
पुस्तक किंवा मासिक: वेळ घालवण्यासाठी पुस्तक किंवा मासिक सोबत ठेवा.
कॅमेरा: जर बाळाचा जन्म झाल्यावर त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा फोटो काढणार असाल तर, कॅमेरा किंवा चांगला कॅमेरा असलेला मोबाईल जवळ ठेवा. बाळाचे होणारे बाबा सोबत असतील तर ही जबाबदारी त्यांच्याकडे द्या. ही आठवण तुमच्यासाठी अत्यंत अनमोल असेल.
बाळासाठी आवश्यक गोष्टी:
* कपडे: बाळासाठी आरामदायक आणि मऊ कपडे घ्या. बाळाच्या अंगाखाली घालण्यासाठी मऊ कपड्यांची दुपटी घ्या.
* डायपर आणि वाइप्स: बाळासाठी पुरेसे डायपर आणि वाइप्स घ्या.
* ब्लँकेट: बाळाला उबदारपणा देण्यासाठी ब्लँकेट घ्या.
* बेबी कॅरियर: हॉस्पिटलमधून घरी जाताना बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी बेबी कॅरियर घ्या.
इतर आवश्यक गोष्टी:
* पैसे: हॉस्पिटलमधील खर्च आणि इतर खर्चांसाठी पैसे सोबत ठेवा.
* चप्पल: हॉस्पिटलमध्ये घालण्यासाठी आरामदायक चप्पल घ्या.
* उशी: झोपताना आराम मिळावा यासाठी उशी सोबत ठेवा.
हेही वाचा - Late Night Sleeping Habits: रात्री उशिरा झोपणे ही केवळ वाईट सवय नाही; तर 'या' गंभीर आजारांना आमंत्रण
टीप
* हॉस्पिटलमध्ये जाताना तुमची बॅग व्यवस्थित चेक करा आणि आवश्यक गोष्टींची यादी तयार करा.
* तुमच्या डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा.
* शांत राहा आणि सकारात्मक विचार ठेवा. ताण-तणाव टाळण्यासाठी मित्र-मैत्रिणी किंवा घरच्यांसोबत हलक्या-फुलक्या गप्पा मारत रहा.
* डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाताना योग्य तयारी केल्यास ऐनवेळी होणारा गडबड-गोंधळ टाळला जाईल.