Sunday, September 07, 2025 11:55:19 AM

चहा प्रेमींसाठी नवीन अनुभव: घ्या गुलाब चहाचा आस्वाद

गुलाब चहा त्याच्या अप्रतिम चवीसाठी आणि आरोग्यवर्धक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे

चहा प्रेमींसाठी नवीन अनुभव घ्या गुलाब चहाचा आस्वाद

चहा! नाव जरी ऐकलं तरी तरतरी येते असा हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा बनलेला भाग म्हणजे चहा. हल्ली तर चहाचे सुद्धा नवनवीन ट्रेंड झालेले पाहायला मिळतात जे लोकांना आकर्षित देखील करतात त्यातीलच एक गुलाब चहा त्याच्या अप्रतिम चवीसाठी आणि आरोग्यवर्धक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. गुलाबाच्या पानांपासून बनवलेला हा चहा आपल्या शरीराला ताजेतवाने आणि मानसिक शांती देतो. चला, तर मग जाणून घ्या गुलाब चहा केवळ चवीतच नाही तर आपल्या आरोग्यासाठी कसा फायद्याचा आहे.

गुलाब चहा कसा बनवावा?
गुलाब चहा बनवणे अतिशय सोपे आहे. यासाठी तुम्हाला फक्त काही साधे घटक लागतात:

साहित्य:
५-७ गुलाबाच्या पाकळ्या (जास्त चवदार असल्या तर चांगले)
१ चमचा चहा पावडर (पिठीसुद्धा वापरू शकता)
१-२ वेलची
१ कप पाणी
१ चमचा मध (आवडीनुसार)
१/२ चमचा लिंबाचा रस (आवडीनुसार)

कृती:
एक पातेल्यात पाणी उकळायला ठेवा.
पाणी उकळल्यावर त्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि वेलची घाला आणि २-३ मिनिटे उकळू द्या.
त्यानंतर चहा पावडर घाला आणि चहा उकळा.
चहा उकळून झाल्यावर गाळून मध आणि लिंबाचा रस घालून चहात मिसळा 
चहा गाळून कपात ओता आणि ताज्या चहाचा आस्वाद घ्या. 

गुलाब चहा चे आरोग्यला फायदे काय ? 

तणाव कमी करतो: गुलाब चहा मानसिक तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी मदत करतो. त्यात असलेल्या गुलाबाच्या अर्कामुळे शांतीचा अनुभव मिळतो.

त्वचेसाठी फायदेशीर: गुलाब चहा त्वचेसाठी एक उत्तम अँटीऑक्सिडन्ट आहे. गुलाबात असलेले घटक त्वचेचा रंग सुधारतात आणि पिंपल्स व इन्फेक्शनसारख्या समस्यांपासून आराम देतात.

पचनासाठी उत्तम: गुलाब चहा पचन क्रिया सुधारतो तसेच गॅस आणि पोट फुगण्याची समस्या कमी करतो.

हृदयासाठी उत्तम: गुलाब चहा हृदयाच्या आरोग्याचा विचार करत शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करतो.

शरीरातील उष्णता कमी करतो: गुलाब चहा शरीरातील उष्णता कमी करतो, त्यामुळे गरमीच्या महिन्यात गुलाब चहा अत्यंत उपयोगी प्येय आहे. 

म्हणून, गुलाब चहा फक्त एक चहा नाही, तर एक ताजेपण आणि आनंददायी अनुभव आहे. दूधाशिवाय हा चहा शरीरासाठी फायदेशीर आणि चवीला ताजेपण देणारा आहे.


सम्बन्धित सामग्री