Sunday, August 31, 2025 02:54:47 PM

अंडरवेअरशिवाय घराबाहेर पडलात तर थेट जेल; जाणून घ्या 'या' देशाचे विचित्र नियम

जगात एक असा देश आहे, जिथं अंडरवेअर न घालता घराबाहेर पडणं, हा कायद्याने गुन्हा ठरतो.

अंडरवेअरशिवाय घराबाहेर पडलात तर थेट जेल जाणून घ्या या देशाचे विचित्र नियम
अंडरवेअरशिवाय घराबाहेर पडलात तर थेट जेल; जाणून घ्या 'या' देशाचे विचित्र नियम

जगभरातील देशांनी आपापल्या सोयीनुसार, नियम बनवले आहेत. काही नियम स्थानिक गरजांनुसार योग्य असले तरी इतर देशांतील लोकांना ते अजब वाटू शकतात. थायलंड हा असा देश आहे जिथं नागरिकांनी तसंच खासकरून पर्यटकांनी काही विशिष्ट नियम न पाळल्यास दंड किंवा जेलची शिक्षा भोगावी लागू शकते. यातील सर्वात चर्चेचा आणि विचित्र नियम म्हणजे अंडरवेअर न घालता घराबाहेर पडणं. थायलंडमध्ये हा कायद्याने गुन्हा ठरतो. 

थायलंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी अंडरवेअर न घालता फिरणं गुन्हा आहे. थाई दंड संहितेच्या कलम 388 नुसार हा गुन्हा मानला जातो. या नियमामागे स्वच्छता आणि सामाजिक शिस्त यांचा संदर्भ देण्यात आला आहे. थाई समाज हा स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणारा असल्यामुळं, अशा नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा नियम अनेक दशकांपूर्वी बनवण्यात आला असला तरी आजतागायत त्यासाठी कुणालाही प्रत्यक्षात अटक झाल्याची नोंद नाही.

हेही वाचा - पॅराग्लायडिंगचा अनुभव घेण्यासाठी 'ही' आहेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणे

अंडरवेअर न घालता फिरात तर पश्चातापाची वेळ येईल 
हा कायदा मुख्यतः पर्यटनामुळं अस्तित्वात आला. थायलंडमध्ये बरेच विदेशी पर्यटक अंडरवेअर न घालता शॉर्ट्समध्ये फिरत होते. ज्यामुळं स्थानिक लोकांमध्ये नाराजी होती. त्यामुळं स्वच्छता आणि शालीनतेचा मुद्दा लक्षात घेऊन सरकारनं हा नियम बनवला. जर तुम्ही थायलंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी अंडरवेअर न घालता जालं, तर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल.  

हेही वाचा - गूगल पे-फोनपेचे डुप्लिकेट अ‍ॅप्स बाजारात; फसवणुकीपासून वाचायचंय? मग हे वाचाच

थायलंडचे हे नियम देखील आहेत अजब 
थायलंडचा अंडरवेअरचा नियमच अजब नाही. याशिवाय आणखी काही नियम आहेत. जे इतराना अजब वाटू शकतात. यात मायक्रोफोन टेस्ट दरम्यान तुम्हाला हॅलो फक्त थाई भाषेतच म्हणावं लागतं. इतर भाषांमध्ये बोलल्यास तुम्हाला 1 महिन्यापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. याशिवाय थायलंडमध्ये इतर देशाचा झेंडा फडकवणं कठोर गुन्हा आहे. तसंच थायलंडमध्ये रात्री 1 ते सकाळी 5 वाजेपर्यंत खाण्या-पिण्याच्या वस्तूंची विक्री बेकायदेशीर मानली जाते. 
 


सम्बन्धित सामग्री