Common Habits That May Harm Your Kidneys: किडनी (मूत्रपिंड) हा शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. किडनीचे काम रक्त फिल्टर करणे, शरीरातील कचरा आणि अतिरिक्त द्रवपदार्थ मूत्राद्वारे काढून टाकणे आहे. शरीरातील पाणी, सोडियम, पोटॅशियम आणि इतर खनिजांचे योग्य संतुलन राखून किडनी नसा व स्नायूंच्या योग्य कार्यात महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु जर किडनी योग्यरित्या काम करत नसेल तर शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ शकतात. त्यामुळे व्यक्तीला अनेक गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला माहिती आहे का की कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या काही चुकीच्या दैनंदिन सवयी किडनीला हानी पोहोचवू शकतात. चला जाणून घेऊया...
वेदनाशामक औषधे (Pain killer tablets)
डोकेदुखी, शरीरदुखी किंवा मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधांचा नियमित आणि विनाप्रिस्क्रिप्शन वापर किडनीला नुकसान पोहोचवू शकतो. नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या.
मीठाचा जास्त वापर
जास्त खारट पदार्थ उदा. चिप्स, नमकीन खाल्ल्याने रक्तदाब वाढतो. ज्यामुळे किडनीचे नुकसान होते. मीठाचा वापर प्रमाणात करा आणि ताज्या अन्नाचे सेवन करा.
हेही वाचा: Mushroom Health Benefits: फक्त चवदारच नाही, मशरूम तुमच्या आरोग्यासाठीही आहे सुपरफूड ; जाणून घ्या फायदे
पुरेसे पाणी न पिणे
डिहायड्रेशनमुळे किडनीवर दबाव येतो. कारण किडनी रक्त फिल्टर करण्यासाठी आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी पाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने दररोज 8-10 ग्लास पाणी प्यावे.
दारू आणि धूम्रपान करणे
जास्त प्रमाणात मद्यपान आणि धूम्रपान केल्याने किडनीचे काम कमी होऊन रक्तदाब वाढतो. या सवयी सोडण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करा.
मूत्र रोखून ठेवणे
जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्याने मूत्राशय आणि मूत्रपिंडांवर दबाव येतो. ज्यामुळे संसर्ग किंवा किडनीतील दगडांचा धोका वाढतो. कोणत्याही कारणाशिवाय लघवी रोखून ठेवणे टाळा.
व्यायामाचा अभाव
व्यायाम न केल्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. जो किडनीसाठी हानिकारक आहे. दररोज 30 मिनिटे हलका व्यायाम करा. उदा. चालणे, योगा किंवा सायकलिंग
किडनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी टिप्स
किडनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमितपणे पाणी प्या, ताजी फळे, भाज्या खा. तसेच सगळ्या धान्यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या. वर्षातून एकदा तुमच्या किडनीची तपासणी करा आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)