Monday, September 01, 2025 09:32:19 AM

Vitamin Deficiency: रात्री नीट झोप लागत नाही? असू शकते 'या' विटामिन्सची कमतरता

अनेकांना दिवसभर काम करूनही रात्री नीट झोप येत नाही, तरी त्याचे कारण फक्त मानसिक ताण किंवा थकवा नसतो. काही वेळा शरीरात काही महत्वाच्या विटामिन्सची कमतरता असल्यामुळेही झोपा प्रभावित होऊ शकते.

vitamin deficiency रात्री नीट झोप लागत नाही असू शकते या विटामिन्सची कमतरता

Sleep Improvement Tips: अनेकांना दिवसभर काम करूनही रात्री नीट झोप येत नाही, तरी त्याचे कारण फक्त मानसिक ताण किंवा थकवा नसतो. काही वेळा शरीरात काही महत्वाच्या विटामिन्सची कमतरता असल्यामुळेही झोपा प्रभावित होऊ शकते. नीट झोप न आल्यास दिवसातील कार्यक्षमता कमी होते, मूड चिडचिडा होतो आणि शरीरावर दुष्परिणाम होतो. तज्ञांचा म्हणण्यानुसार, नीट आणि गाढ झोपेसाठी केवळ आरामदायक अंथरून पुरेसे नाही, तर योग्य पोषण घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

विटामिन D
विटामिन D आपला शरीरातील झोपेचे चक्र नियंत्रित करण्यास मदत करते. ह्याची कमतरता असल्यास शरीरात थकवा जाणवतो आणि अनिद्रा वाढते. विशेषत: जे लोक नेहमी घराबाहेर नसतात किंवा पुरेसा सूर्यप्रकाश घेत नाहीत, त्यांना झोप न येण्याची समस्या जास्त आढळते. रोज सुमारे 20 मिनिटे सूर्यप्रकाशात राहणे आणि दूध, अंडी, मशरूम यांचा समावेश आहारात समावेश करणे फायद्याचे ठरते.

हेही वाचा: Curd And Buttermilk Benefits: दही की ताक? पावसाळ्यात आरोग्यासाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर?

 

विटामिन B12
विटामिन B12 मेंदू आणि नर्वस सिस्टीमसाठी महत्त्वाचे आहे. या विटामिनची कमतरता झाल्यास मेलाटोनिन हॉर्मोनचे संतुलन बिघडते, जे झोप येण्यासाठी आवश्यक आहे. परिणामी, रात्री नीट झोप येत नाही किंवा झोप सतत मोडते. दही, दूध, अंडी, फिश आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करून B12 ची कमतरता दूर केली जाऊ शकते.

मॅग्नेशियम 
मॅग्नेशियम हे खनिज असूनही झोप सुधारण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. हे मेंदू शांत ठेवते आणि स्नायूंना आराम देते. कमी मॅग्नेशियम मुळे झोपेची गुणवत्ता कमी होते. केळी, हिरव्या भाज्या आणि डाळी आहारात समाविष्ट केल्यास फायदा होतो. आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सप्लिमेंट्स घेतले जाऊ शकतात.

हेही वाचा: hanakya Niti : चुकूनही 'या' 7 लोकांना कधीच सल्ला देऊ नका; अन्यथा, होईल मोठे नुकसान

नीट झोपेसाठी इतर उपाय

रात्री झोपण्यापूर्वी मोबाइल आणि लॅपटॉपचा वापर कमी करा.

हलके जेवण करा व कॅफीनचे सेवन टाळा.

रिलॅक्सेशन तंत्र वापर जसे कि मेडिटेशन किंवा दीर्घ श्वास घेणे.

रोज एका निश्चित वेळेला झोपा आणि वेळेत उठण्याची सवय लावा.

जर सतत झोपेची समस्या येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे फक्त मानसिक ताणाचे कारण नसून शरीरातील विटामिन्सची कमतरता दर्शवते. योग्य आहार, सूर्यप्रकाश आणि आवश्यक असल्यास सप्लिमेंट्स वापरून आपली झोप सुधारता येते आणि दिवसात ऊर्जा व उत्साह कायम राहतो.

(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र यातून कोणताही दावा करत नाही किंवा याची हमी देत नाही.)

 


सम्बन्धित सामग्री