नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता पात्र शेतकरी कुटुंबांना 24 फेब्रुवारी 2025 रोजी जारी केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भागलपूर दौऱ्यावर आहेत. आज ते भागलपूरला भेट देतील. यावेळी किसान सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याची घोषणा पंतप्रधान मोदी करणार आहेत.
आतापर्यंत पीएम किसान सन्मान योजनेचे 18 हप्ते वितरित झाले असून 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे. मागील हप्त्यात एकूण 9.58 कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे.
पंतप्रधान किसान योजना काय आहे?
जमीनधारक शेती करणाऱ्या कुटुंबांना दरवर्षी 6 हजार रूपये केंद्र सरकारकडून मदत केली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाते. दर चार महिन्यांनी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 हजार रूपये जमा केले जातात. पात्र कुटुंबातील सदस्यांमध्ये पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले याचा समावेश आहे.
हेही वाचा : Ind vs Pak : पाकचे वस्त्रहरण करत टीम इंडियाने घेतला बदला, ‘किंग’ कोहलीची नाबाद शतक खेळी
पीएम किसान लाभार्थीची स्थिती कशी तपासायची?
लाभार्थीचे स्टेटस पाहण्यासाठी अधिकृत पीएम किसान वेबसाइटवर जा. त्यानंतर Beneficiary Status Page वर जा. Beneficiary Status वर क्लिक करा. तिथे लाभार्थीचा आधारकार्ड क्रमांक किंवा खाते नंबर टाका. त्यानंतर गेट डेटावर क्लिक करा. यानंतर योजनेच्या लाभार्थीची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल.
ई-केवायसी (eKYC) आवश्यक आहे
सर्व पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांनी त्यांची ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना उपलब्ध असलेले ईकेवायसीचे तीन प्रकार म्हणजे ओटीपी-आधारित ई-केवायसी (पीएम-किसान पोर्टल आणि मोबाइल अॅपद्वारे उपलब्ध), बायोमेट्रिक-आधारित ई-केवायसी (कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) आणि राज्य सेवा केंद्र (एसएसके) येथे उपलब्ध), आणि फेस ऑथेंटिकेशन-आधारित ई-केवायसी आहे. (लाखो शेतकऱ्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या पीएम किसान मोबाइल अॅपवर उपलब्ध).
हेही वाचा : Meta ने भारतातील तरुणांसाठी सुरू केली भरती; 'या' शहरात उघडणार नवीन कार्यालय
पंतप्रधान किसान योजनेसाठी कोण पात्र नाही?
खासदार, आमदार, मंत्री किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष असे कोणतेही घटनात्मक पद भूषविणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.जे शेतकरी आयकर भरतात ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. कोणत्याही संस्थात्मक जमिनीचे धारक शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
अपात्र शेतकऱ्यांनी पीएम किसान लाभ कसे परत करावेत
पीएम किसान वेबसाइटवर जाऊन खाली स्क्रोल करा. त्यानंतर ‘voluntary surrender of pm-kisan benefits क्लिक करा. त्यानंतर एक पेज ओपन होईल. तिथे नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर गेट ओटीपीवर क्लिक करा. मग तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. एकूण मिळालेला हप्ता दाखवण्यासाठी मोबाईल नंबर एंटर करा. तुम्हाला तुमचा पीएम किसान लाभ परत करायचा आहे का' यावरील 'होय' बटणावर क्लिक करा आणि ओटीपी एंटर करा.
जे शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचा मिळालेला लाभ किंवा हप्ता परत करतील. त्यांना पुढे पीएम-किसान योजनेचा लाभ मिळू शकत नाही. तसेच योजनेसाठी पुन्हा नोंदणीदेखील करता येणार नाही.