Monday, September 01, 2025 10:46:29 AM

PUNE: पुण्यातील स्वारगेटजवळ 60 किलो गांजा पोलिसांनी केला जप्त

कर्नाटकातून गांजा विक्रीसाठी आलेल्या एका परप्रांतीय आरोपीला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शंकरशेठ रस्त्यावर पकडले. 12 लाख रुपये किमतीचा 60 किलो गांजा यादरम्यान पोलिसांनी जप्त केला आहे.

pune पुण्यातील स्वारगेटजवळ 60 किलो गांजा पोलिसांनी केला जप्त

पुणे: कर्नाटकातून गांजा विक्रीसाठी आलेल्या एका परप्रांतीय आरोपीला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शंकरशेठ रस्त्यावर पकडले. 12 लाख रुपये किमतीचा 60 किलो गांजा यादरम्यान पोलिसांनी जप्त केला आहे. हा आरोपी मूळचा कर्नाटकचा आहे. पुण्यात, गेल्या अनेक दिवसांपासून आरोपीकडून गांजाची विक्री होत होती. आरोपी कर्नाटक राज्यातून गांजा आणत पुण्यात विक्री करत होता. 

नदीम मोईज शेख (वय 28, रा. बिदर, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अमली पदार्थ विक्री प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात आरोपी नदीमविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांना माहिती मिळताच:

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शंकरशेठ रस्त्यावर पाहणी करत होते. यादरम्यान, झोले पाटील चौकात एक व्यक्ती कारमध्ये थांबला होता. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांना त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी त्याच्या कारची झाडाझडती केली. त्यानंतर, कारमधून तब्बल 12 लाख रुपये किमतीचा 60 किलो गांजा सापडले. त्यानंतर, पोलिसांनी त्याला अटक केली. 

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, हवालदार सुजीत वाडेकर, सचिन माळवे, संदीप शिर्के यांनी ही कामगिरी केली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार:

"झोडणी दरम्यान, आम्हाला त्याच्या कारमधून 30 पॅकेटमध्ये 60 किलो गांजा सापडला. आम्ही बंदी घातलेला पदार्थ, एक मोबाईल फोन आणि एक कार जप्त केली आहे ज्याची एकूण किंमत 17.10 लाख रुपये आहे आणि त्यासोबतच, आरोपीला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे," असे एका अधिकाऱ्यांनी माहिती दिली. 

 

पोलिसांनी तब्बल 683 किलो गांजा केला नष्ट:

मागील काही महिन्यांमध्ये पोलिसांनी केलेल्या 52 कारवायांमधील 683.830 किलोचा गांजा नष्ट केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व शासकीय विभागात सात कलमी कार्यक्रम राबविण्याची सूचना दिली होती. 


सम्बन्धित सामग्री