Sunday, August 31, 2025 04:35:32 AM

बारामतीत पोटच्या चिमुकल्याचा जीव टांगणीला लावून दोरीवरच्या कसरतीचा खेळ

डोंबारी समाजाला पोटाची खळगी भरण्यासाठी कराव्या जीवघेण्या कसरती लागतात. अशातच बारामतीत पोटच्या चिमुकल्या गोळ्याचा जीव धोक्यात टाकून दोरीवरच्या कसरतीचा खेळ करावा लागतो.

बारामतीत पोटच्या चिमुकल्याचा जीव टांगणीला लावून दोरीवरच्या कसरतीचा खेळ

बारामती : शिक्षणाचा गंध नाही आणि रोजगाराची साधनं नाहीत अशा अडचणीत सापडलेल्या डोंबारी समाजाला पोटाची खळगी भरण्यासाठी कराव्या जीवघेण्या कसरती लागतात. गावोगावी जाऊन पोट भरण्यासाठी कसरत करावी लागते. अशातच बारामतीत पोटच्या चिमुकल्या गोळ्याचा जीव धोक्यात टाकून दोरीवरच्या कसरतीचा खेळ करावा लागतो. 

शाळेत जाऊन शिकण्याच्या आणि स्वच्छंदीपणे बागडण्याच्या वयातच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी उचलत दोरीवर कसरतीचे खेळ करून पैसे कमावण्याची वेळ डोंबारी समाजातील आठ वर्षाच्या चिमुकलीवर आली आहे. दोरीवरच्या जीवघेण्या कसरतीच्या भरवशावर कुटुंबाला दोन वेळचे अन्न मिळेल म्हणून तिने तिचे बालपण हरविले आहे. हाताला काम नसल्याने आपले बिऱ्हाड घेऊन परराज्यातील एक तरुण, त्याची पत्नी व लहान मुलांसह पोटाची खळगी भरण्यासाठी दोरीवरचा खेळ दाखवून गावोगावी भटकंती करत आहेl. काही दिवसांपासून तो बारामती तालुक्‍यात वास्तव्यास असून, शहरातील रहदारीच्या ठिकाणी चार पैसे जास्त मिळेल या आशेने दोरीचा खेळ सादर करत आहेत.

हेही वाचा: अजित पवार अदाणी, अंबानीपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा आरोप

अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकलीने दोरीवर चालण्याच्या चित्तथरारक कसरतr केल्या आहेत. शिकण्याच्या, खेळण्याच्या वयात ती स्वतःच्या जिवाची बाजी लावत आपल्या कुटुंबाचा आधारवड बनली आहे. पोटाची आग खूप मोठी असते. याच टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःचे घर व गाव सोडून भटकंती करावी लागत आहे. आम्हालाही मुलांना शिकवावे वाटते. परंतु कुटुंबाचा उदरनिर्वाह एका जागी राहून होत नाही असे जीव घेण्या कसरती करणाऱ्या चिमुकलीच्या वडिलांनी सांगितले आहे.

मात्र अशा प्रकारच्या कसरती करून तोल जाऊन त्या चिमुकल्याचा अपघात होऊ शकतो याची जाणीव सुद्धा ठेवली पाहिजे. आता डोंबारी समाजाच्या लोकांनी अश्या जीवघेण्या कसरती करण्याऐवजी रोजगाराचे नवे मार्ग शोधण्याची गरज आहे.
 


सम्बन्धित सामग्री