नवनाथ बोरकर. प्रतिनिधी. बारामती: बारामती शहरातील बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापकाने बँकेतच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कामाचा अतिरिक्त भार आणि वरिष्ठांचा दबाव यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी चिट्ठीत नमूद केल आहे. 'कर्मचाऱ्यावर अतिरिक्त कामाचा भार टाकू नका', अशी विनवणी देखील या व्यवस्थापकाने चिठ्ठीद्वारे केली आहे. आत्महत्या केलेल्या शाखा व्यवस्थापकाचे नाव शिवशंकर मित्रा आहे.
हेही वाचा: 'जो भारताचा नागरिक नाही...'; पंतप्रधान मोदींचा घुसखोरांना इशारा
स्वेच्छा निवृत्तीसाठी शिवशंकर मित्रा यांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला होता. मात्र, कामाचा असह्यतान आणि वरिष्ठांचा दबावामुळे त्यांनी शुक्रवारी बँकेतच गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर, बारामती परिसरात विशेषता बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवर बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे म्हणाले की, 'आत्महत्या केलेल्या शिवशंकर मित्रा यांनी चिट्टी मध्ये लिहिले की, ''सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव आहे. ते 100% आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण देऊ नका'', अशी विनंती त्यांनी चिठ्ठीद्वारे केली आहे. ''आत्महत्याचा निर्णय मी पूर्ण शुद्धीत आणि स्वतःच्या इच्छेनुसार घेतला आहे. यात माझ्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही. बँकेतील कामाच्या प्रेशरमुळे हे टोकाचे पाऊल उचलत आहे. माझ्या या निर्णयासाठी माझी पत्नी प्रिया आणि मुलगी माही या दोघींनी मला माफ करावं आणि शक्य झाल्यास माझ्या मृत्यूनंतर माझे डोळे दान करावेत'', असं त्यांनी नमूद केलं आहे'.