सातारा : साताऱ्यात अनोखी घटना घडली आहे. एका मातेने चक्क चार बाळांना जन्म दिला आहे. आश्चर्याची बाब अशी की याच मातेने 5 वर्षांपूर्वी 3 बाळांना जन्म दिला होता. त्यामुळे या एका मातेच्या कुशीत आत्ता सात बाळे विसावणार आहेत. मात्र ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी आहे. सातारा जिल्हा रुग्णालयात ही अनोखी घटना घडली आहे. कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया या 27 वर्षीय तरुणीने एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला. त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. याआधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला तीन बाळं झाली होती.
हेही वाचा : Team India Victory: ‘आम्ही पहलगाम पीडितांसोबत उभे आहोत'; सूर्यकुमार यादवकडून भारताचा विजय सशस्त्र दलांना समर्पित
गुजरातमधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासवडमध्ये गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता सात बाळाचं अधिवास खुलणार आहे. अवघड अशी ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळ ठणठणीत आहेत. या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉ. देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ. खडतरे, डॉ. झेंडे, डॉ. दिपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने सहाय्य केले. एका मातेच्या पोटी इतक्या लहानग्यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.