Monday, September 15, 2025 02:08:08 PM

Kaas Plateau Tourism : निसर्ग सोहळा अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक कासपठारावर; मात्र वाहतुककोंडीमुळे तासन् तास पडले अडकून

वन विभाग आणि कास पठार कार्यकारी समितीने पर्यटकांना 'kas.ind.in' या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करूनच येण्याचे आवाहन केले होते. मात्र, पर्यटक याविषयी उदासीन राहिले.

kaas plateau tourism  निसर्ग सोहळा अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक कासपठारावर मात्र वाहतुककोंडीमुळे तासन् तास पडले अडकून

सातारा : जगप्रसिद्ध कास पठार (Kaas Plateau in Satara, Maharashtra) सध्या फुलांच्या विविध रंगांनी बहरले आहे आणि हा निसर्गरम्य सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. पण, या गर्दीमुळे कास पठाराला जत्रेचे स्वरूप आले आहे आणि संपूर्ण सातारा-कास रस्ता सलग दुसऱ्या दिवशी ठप्प झाला आहे.

वाहतूक कोंडीने पर्यटक हैराण
रविवारी, साताऱ्यात 'हाफ हिल मॅरेथॉन' असल्याने शहरात आधीच गर्दी होती. त्यातच हजारो पर्यटक कासकडे वळल्याने सातारा-कास रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. घाटाई फाट्यावरील वाहनतळावर पोहोचण्याआधीच वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. यामुळे सकाळपासूनच पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. पोलीस प्रशासनाने एकेरी वाहतुकीचा पर्याय दिला असला तरी, वाहनांची संख्या इतकी जास्त होती की हा प्रयत्नही अपयशी ठरला. अनेक तासांपासून शेकडो वाहने रस्त्यात अडकून पडली होती.

हेही वाचा - Satara News : अबब! एक नव्हे दोन नव्हे तब्बल 4 बाळांना जन्म; हे दाम्पत्य झाले सात बाळांचे पालक

ऑनलाइन नोंदणीचे आवाहन; मात्र, पर्यटक उदासीन
सप्टेंबरच्या मध्यापासून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कास पठाराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे. कास पठाराला येत असताना http://www.kas.ind.in या वेबसाईटला ऑनलाइन नोंदणी करून येण्याचे आवाहन वन विभागाने व कास पठार कार्यकारी समितीने केले आहे.

वन विभाग आणि कास पठार कार्यकारी समितीने पर्यटकांना 'kas.ind.in' या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करूनच येण्याचे आवाहन केले होते. मात्र, अनेक पर्यटकांनी हे आवाहन धुडकावून लावले. यामुळे नियोजनाचा पूर्णपणे फज्जा उडाला आणि संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडली. यामुळे कर्मचाऱ्यांसह पर्यटकांनाही मोठा फटका बसत आहे. स्थानिकांच्या मते, पर्यायी मार्गांचा योग्य वापर केल्यास ही वाहतूक कोंडी कमी होऊ शकते, पण सध्या तरी या समस्येने पर्यटकांना हैराण केले आहे.

कास पठार - फुलांचा स्वर्ग
जगाच्या वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या कास पठारावर 850 पेक्षा जास्त फुलांच्या प्रजाती आढळतात. सध्या इथे 132 रंगीबेरंगी फुले फुलली आहेत. यामध्ये टूथब्रश, दीपकांडी, चवर, भुईकारवी, सोनकी, तेरडा, वायुतुरा, सीतेची आसवे, धनगरी फेटा यांसारख्या विविध फुलांचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यापासून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कास पठाराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो. मात्र, या स्वर्गात पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीचे मोठे आव्हान पर्यटकांपुढे उभे ठाकले आहे.

पर्यायी मार्गाची गरज..
साताऱ्याकडून येणारी कास पठारावर घाटाई फाटा व कास तलाव वाहनतळ मेढा सातारा अशी वाहतूक वळविल्यास वाहतूक कोंडीची समस्या कमी होऊ शकते, असे स्थानिकांनी सांगितले.

हेही वाचा - Kolhapur News : 'मंदिराच्या मूळ रचनेचे नुकसान होता कामा नये', मंत्री माधुरी मिसाळ यांचे आदेश


सम्बन्धित सामग्री