Wednesday, September 03, 2025 10:48:54 AM

वर्ध्यातील हिंगणघाटात पाहायला मिळाले अद्भूत दृष्य; सूर्याभोवती इंद्रधनुचे सूर्यमंडल

वर्ध्याच्या हिंगणघाट आणि आसपासच्या परिसरात एक अत्यंत दुर्मिळ आणि विस्मयकारक नैसर्गिक घटना अनुभवता आली.

वर्ध्यातील हिंगणघाटात पाहायला मिळाले अद्भूत दृष्य सूर्याभोवती इंद्रधनुचे सूर्यमंडल

वर्धा: वर्ध्याच्या हिंगणघाट आणि आसपासच्या परिसरात एक अत्यंत दुर्मिळ आणि विस्मयकारक नैसर्गिक घटना अनुभवता आली. सूर्याभोवती इंद्रधनुष्याचे एक सुंदर वर्तुळ तयार झाल्याचे अनेकांनी पाहिले, सूर्याभोवती दिसणारे हे वर्तुळ म्हणजे 'सन हालो' किंवा मराठीमध्ये 'सूर्यमंडल' म्हणून ओळखले जाते.

हेही वाचा : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात नवरा, सासू आणि नणंदेला अटकेत
इंद्रधनुष्य हे साधारणतः पावसाळ्यानंतर सूर्याच्या विरुद्ध दिशेला दिसते, तर सन हालो हे सूर्याभोवतीच दिसते. सकाळच्या वेळी आकाशात अचानक हे नयनरम्य दृश्य दिसू लागले. सूर्याभोवती एक मोठे, तेजस्वी आणि रंगांनी भरलेले वर्तुळ स्पष्टपणे दिसत होते, जणू काही निसर्गाने स्वतः काढलेले हे एक चित्र होते. हे वर्तुळ इंद्रधनुष्याप्रमाणे विविध रंगांनी युक्त होते आणि सूर्याच्या तेजामुळे ते अधिकच आकर्षक दिसत होते. या घटनेमुळे निसर्गाच्या अद्भुत शक्तीची आणि सौंदर्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. अशा प्रकारची नैसर्गिक दृष्ये पाहणे हे नेहमीच आनंददायी आणि विस्मयकारक असते. आजचा हा 'सन हालो' हिंगणगाटच्या नागरिकांसाठी एक विशेष आठवण बनून राहील.


सम्बन्धित सामग्री