Saturday, September 13, 2025 08:32:20 AM

तरुणीला त्रिकुटाची धक्काबुक्की; जाब विचारणाऱ्या तरुणाला जबर मारहाण

घणसोली गावात एका तरुणीला त्रिकुटाने धक्का दिल्यामुळे सुरू झालेल्या भांडणाचे रूपांतर जबर मारहाणीत झाले. या घटनेमुळे पीडित राकेश मोरे गंभीर जखमी असून त्याच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तरुणीला त्रिकुटाची धक्काबुक्की जाब विचारणाऱ्या तरुणाला जबर मारहाण

नवी मुंबई: नवी मुंबईतील घणसोली गावात एका तरुणीला त्रिकुटाने धक्का दिल्यामुळे सुरू झालेल्या भांडणाचे रूपांतर जबर मारहाणीत झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे पीडित राकेश मोरे गंभीर जखमी असून सध्या त्याच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना रविवारी कायंकाळी घडली होती. 19 वर्षांची एक तरुणी आपल्या आईसह बिल्डींगमध्ये जात असताना तिथे उभ्या असलेल्या तिघांपैकी एकाने तरुणीला धक्का दिला. यावरून तरुणीने त्रिकुटासोबत वाद सुरू केला. संबंधित तरुणी त्रिकुटांसोबत वाद करत असताना अचानक राकेशने या प्रकरणात मध्यस्थी करून त्यांना जाब विचारला. त्यामुळे त्या तिघांना राग आला आणि त्यांनी राकेशला जबर मारहाण सुरू केली. या तिघांनी राकेशला लाथाबुक्क्यांनी आणि जवळच्या काठ्यांनी मारहाण केली.

या हल्ल्यात राकेश गंभीर जखमी झाला असून, स्थानिक नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या राकेशची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याचे उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या तिघांपैकी एका आरोपीला अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. उर्वरित दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकत आहेत. या घटनेमुळे, पोलिसांनी नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, महिलांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही आणि गस्त वाढवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पुढील तपासासाठी पोलिस सर्व बाजूंनी चौकशी करत असून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.


सम्बन्धित सामग्री