Sunday, August 31, 2025 02:02:46 PM

सरकारच्या आश्वासनानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी सोडलं उपोषण

पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या होत्या.

सरकारच्या आश्वासनानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी सोडलं उपोषण

पुणे : पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या होत्या. नुकतच त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. उपोषण मागे घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मतदारांना न्याय मिळाला हे महत्त्वाचं अशी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने आश्वासन दिल्यानंतर सुळे यांनी उपोषण मागे घेतलं आहे. रस्ता दुरूस्तीच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आले होते. 

पुण्यातील भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. यावरून पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणारे रस्त्याचे काँंक्रिटीकरण करण्याची मागणी सुळे यांनी केली होती.  सतत पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाकडून आश्वासन मिळत असल्याने सुळे उपोषणाला बसल्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचा दबाव असल्याचा देखील आरोप त्यांनी केला होता. 

हेही वाचा : कोल्हापुर सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर

सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली असून जिल्हा परिषदेच्या सीओंनी आंदोलनस्थळी जाऊन सुळे यांची भेट घेतली आणि आता काही वेळापूर्वीच सुळे यांनी उपोषण मागे घेतले. गेल्या तास तासांपासून कडक उन्हामध्ये सुळे यांचे उपोषणाला सुरू होते. अखेर त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे. 

उपोषणावेळी काय म्हणाल्या सुळे? 
आमची मागणी फक्त 700 मीटर रस्त्याच्या दुरुस्तीची आहे. येत्या 14 दिवसांमध्ये कामाला सुरुवात करा. सरकार म्हणतं, पावसाळ्याआधी काम करु. जोपर्यंत कामाचं आश्वासन मिळणार नाही, मागे हटणार नाही असा इशारा सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला दिला आहे. 


सम्बन्धित सामग्री