Sunday, August 31, 2025 02:20:13 PM

सासरच्या जाचाला कंटाळून आणखी एका विवाहितेची आत्महत्या

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील उच्चभ्रू परिसर असलेल्या गंगापूरमध्ये एका विवाहित महिलेच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे.

सासरच्या जाचाला कंटाळून आणखी एका विवाहितेची आत्महत्या

नाशिक: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील उच्चभ्रू परिसर असलेल्या गंगापूरमध्ये एका विवाहित महिलेच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात तिच्या सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राजेंद्र आणि सुशील हगवणेंनी थार जप्त

नेमकं प्रकरण काय?

गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या भक्ती गुजरातीने (वय: 37) घरात होणाऱ्या सततच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच मृत भक्तीच्या कुटुंबीयांनी गंगापूर रोड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

व्यवसायाने भक्ती गुजराती यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे सराफ आहेत. आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच त्यांनी नाशिकमध्ये येऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली. मृत भक्ती गुजराती यांना 5 वर्षांचा मुलगा आहे. तसेच, मृत भक्तीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी तिच्या नवऱ्याला त्वरीत अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

एकीकडे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे, तर दुसरीकडे हा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे जिथे सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली. मृत भक्तीला तिच्या सासरच्यांनी मारहाण केली होती की तिच्यावर पैशासाठी दबाव होता? भक्तीने इतके टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास पोलीस करत आहेत.


सम्बन्धित सामग्री