Thursday, August 21, 2025 02:12:03 AM

खळबळजनक घटना; डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आणखी एका महिलेचा मृत्यू

देसाईगंज तालुक्यातील विसोरा गावात डॉक्टर आणि नर्सच्या निष्काळजीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

खळबळजनक घटना डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आणखी एका महिलेचा मृत्यू

गोंदिया: पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रकरण ताजे असतानाच गडचिरोलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील केटीएस रुग्णालयात एक दुर्दैवी घटना घडली आहे. देसाईगंज तालुक्यातील विसोरा गावात डॉक्टर आणि नर्सच्या निष्काळजीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे संबंधित डॉक्टर आणि इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य सेविकेची सेवा देखील बंद करण्यात आली आहे, ज्यामुळे रुग्णालयात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

माहितीनुसार, मृत महिलेचे नाव प्रतिभा मुकेश उके (वय: 30) आहे. मृत महिला आंबेडकर वॉर्ड, सिंगलटोली, गोंदिया येथे आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती. त्यांचे माहेर तिडका, तालुका सडक-अर्जुनी येथे आहे. प्रसूतीसाठी प्रतिभा उके त्यांच्या माहेरी गेल्या होत्या. 10 एप्रिल रोजी प्रतिभा उके यांना सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, 24 तास प्रयत्न करूनही सामान्य प्रसूती न झाल्यामुळे, प्रतिभा उके यांना 11 एप्रिल रोजी गोंदियाच्या गंगाबाई स्त्री रुग्णालयात रेफर करण्यात आले. त्यानंतर गंगाबाई रुग्णालयात प्रतिभा उके यांनी सामान्य प्रसूतीद्वारे एका बाळाला जन्म दिला. यादरम्यान, एकीकडे डॉक्टरांनी नवजात बाळाला अतिदक्षता विभागात दाखल केले, तर दुसरीकडे प्रतिभा यांना प्रसूतीनंतरच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले.


सम्बन्धित सामग्री