Monday, September 01, 2025 12:54:06 PM

सरकारने खरी म्हणून नकली वाघनखे आणली; वाघनखांबाबत असीम सरोदेंचा खळबळजनक दावा

वकील असीम सरोदे सध्या लंडनमध्ये आहेत. लंडनच्या दौऱ्यावर असताना त्यांनी लंडनमधील अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया म्यूझियमला भेट दिली. यादरम्यान, त्यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करत सरकारवर आरोप केला आहे.

सरकारने खरी म्हणून नकली वाघनखे आणली वाघनखांबाबत असीम सरोदेंचा खळबळजनक दावा

मुंबई: नुकताच, वाघनखांबाबत वकील असीम सरोदे यांनी खळबळजनक दावा केला आहे. 'राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आहे, असे म्हणून महाराष्ट्रात नकली वाघनखे आणली आहेत आणि त्यांचे प्रदर्शन केले. या प्रकरणी सरकारने करदात्यांच्या पैशांचा गैरवापर केला आहे', असा आरोप शनिवारी वकील असीम सरोदे यांनी सरकारवर केला आहे. सध्या, वकील असीम सरोदे लंडनमध्ये आहेत. लंडनच्या दौऱ्यावर असताना त्यांनी लंडनमधील अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया म्यूझियमला भेट दिली. यादरम्यान, त्यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करत सरकारवर आरोप केला आहे.

काय म्हणाले असीम सरोदे?

वकील असीम सरोदे सध्या लंडनमध्ये आहेत. लंडनच्या दौऱ्यावर असताना त्यांनी लंडनमधील अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया म्यूझियमला भेट दिली. यादरम्यान, त्यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करत सरकारवर आरोप केला आहे. ते म्हणाले की, 'सरकारने आणलेली वाघनखे मुळातच छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत. उलट, सरकारने नकली वाघनखे आणली आहेत आणि त्यांचे प्रदर्शन केले आहे. लोकांच्या करातून जमवलेल्या निधीचा सरकारने गैरवापर केला आहे. आणि हा सर्व प्रकार घडत असताना आपण फक्त बघत राहिलो', असे सरोदे म्हणाले.

ती वाघनखे खरंच महाराजांची आहेत का?

एक्सवर पोस्ट करत वकील असीम सरोदे म्हणाले की, 'सध्या आम्ही अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया मेमोरियल संग्रहालयात आहोत. महाराष्ट्र आणि भारताच्या विषयाशी संबंधित एका महत्वाच्या मुद्द्यासाठी आम्ही इथे लंडनमध्ये आलो आहोत. अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया मेमोरियल संग्रहालयातील हा कोपरा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मुघल आणि मराठा साम्राज्याच्या काळात ज्या काही मोठ्या लढाया, युद्ध किंवा शस्त्र वापरले गेले, ते इथे ठेवले आहेत. ज्या वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता, ती वाघनखे इथे आहेत, असे सांगण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी अशी माहिती देण्यात आली होती की 'काही कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र सरकारने ती वाघनखे 3 वर्षांसाठी आपल्या ताब्यात घेतली आहेत'.

ही वाघनखे खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली होती का? याबद्दल इतिहासाचे संशोधक इंद्रजित सावंत यांनी अत्यंत चांगले विश्लेषण केले आहे. मी इतिहासकार नाही, पण अभ्यासू लोक जेव्हा काहीतरी सांगतात तेव्हा आपण काही गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा. लॉर्ड एल्फिन्स्टन आणि ग्रँड डफला सातारच्या प्रतापसिंह छत्रपती यांनी वाघनखे भेट दिली. त्यांनी सुद्धा ही वाघनखे शिवाजी महाराजांची आहेत, असा दावा केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे साताऱ्यातील छत्रपतींकडे आहेत, असे प्रत्यक्षदर्शींनी लिहून ठेवले आहे. याच अस्सल वाघनखांसारखी दिसणारी वाघनखे प्रतापसिंह यांनी मला भेट दिली, असे एल्फिन्स्टनसारख्या इतिहासकारांनी लिहिले आहे. यावर आपण विश्वास ठेवायचा की नाही? असा सवाल इंद्रजित सावंत यांनी विचारला आहे.

वाघनखांमुळे लोकांच्या आयुष्यात कोणते बदल झाले?

पुढे वकील असीम सरोदे म्हणाले की, 'व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्यूझियममध्ये यासंबंधी लावण्यात आलेल्या फलकावर 'क्लेम' असा शब्द लिहिला आहे. या म्यूझियमच्या 22 व्या क्रमांकावर सरकारने आणलेली वाघनखे ठेवण्यात आली होती. त्या ठिकाणी ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत, पण त्याचवेळी अनेकांनी असा दावा केला आहे'.

'ही वाघनखे महाराष्ट्र सरकारने आपल्या सर्वांच्या करातून गोळा झालेल्या पैशांचा वापर करून महाराष्ट्रात आणली आहेत. मात्र, ही वाघनखे नकली असल्याचा दावा अनेक इतिहासकार करत आहेत. या वाघनखांना महाराष्ट्रात आणल्यानंतर लोकांच्या आयुष्यात फार काही फरक पडला नाही. मग कोट्यवधींचा खर्च करून या संग्रहालयाची कमाई का करून देण्यात आली? हा सर्वात महत्वाचा सवाल आहे. यामुळे सजग नागरिकांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या शिवप्रेमींनी येथील वाघनखे भाड्याने महाराष्ट्रात प्रदर्शनासाठी का नेली? असा सवाल उपस्थित केला पाहिजे', असे सरोदे म्हणाले.


सम्बन्धित सामग्री