Monday, September 01, 2025 02:35:51 PM

Ganeshotsav 2025 : सरकारचं मोठं गिफ्ट ! कोकणात जाताना टोल नाही, तसेच 5 दिवस आधीच होणार पगार

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंंदवार्ता आहे. 23 ऑगस्टपासून ते 8 सप्टेंबरपर्यंत कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसना टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे.

ganeshotsav 2025  सरकारचं मोठं गिफ्ट  कोकणात जाताना टोल नाही तसेच 5 दिवस आधीच होणार पगार

मुंबई: गणेशोत्सव जवळ आल्यावर गणेशभक्त मोठ्या प्रमाणात कोकणात येतात. या पार्श्वभूमीवर, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंंदवार्ता आहे. 23 ऑगस्टपासून ते 8 सप्टेंबरपर्यंत कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसना टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. 

यासाठी, 'गणेशोत्सव 2025 - कोकण दर्शन' नावाचा विशेष पास दिला जाणार आहे. त्या पासवर वाहनाचा नंंबर आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांना दिली.  हा पास आरटीओ, पोलीस आणि वाहतूक विभाग यांच्या कार्यालयात मिळणार असून परतीच्या प्रवासासाठीसुद्धा तोच पास चालेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले की, 'ग्रामीण आणि शहरी पोलीस तसेच आरटीओ विभागाने एकत्रितपणे हे पास वेळेवर गणेशभक्तांपर्यंत पोहोचवावेत, जेणेकरून प्रवासादरम्यान कोणालाही अडचण येणार नाही'.

हेही वाचा: Gas Leak at Pharma Company in Boisar: बोईसरमध्ये फार्मा कंपनीत गॅस गळती; 4 कामगारांचा मृत्यू

गणेशोत्सवादरम्यान 'या' मार्गावर असणार जड वाहतुकीला बंदी

23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपर्यंत 16 टनापेक्षा जास्त वजन असलेल्या वाहनांना मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे.

सरकारी नोकरदारांसाठी आनंदवार्ता! 5 दिवस आधीच मिळणार पगार

शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि निवृती वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवसांपूर्वीच त्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. गणेशोत्सवादरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचण होऊ नये, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे की, कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट महिन्याचे वेतन 26 ऑगस्ट रोजीच देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, सरकारी कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.


सम्बन्धित सामग्री