Sunday, August 31, 2025 08:11:10 PM

'बाप आजोबा आले तरी मुंबई...'; फडणवीसांचं रोखठोक वक्तव्य

'मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा भाजपचा डाव आहे', हा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून सतत विरोधी पक्ष मांडत आहेत. यावर मौन सोडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधासभेत रोखठोक वक्तव्य केले.

बाप आजोबा आले तरी मुंबई फडणवीसांचं रोखठोक वक्तव्य

मुंबई: राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. नुकताच, शुक्रवारी पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. यादरम्यान, 'मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा भाजपचा डाव आहे', हा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून सतत विरोधी पक्ष मांडत आहेत. यावर मौन सोडत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधासभेत रोखठोक वक्तव्य केले की, 'मुंबई महाराष्ट्राचीच आहे. कुणाचा बाप आला, बापाचा बाप आला, त्याचा आजोबा आला तरी मुंबई महाराष्ट्राचीच राहील'. 

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

पुढे फडणवीस म्हणाले, 'प्रत्येकवेळी वर्ष-दीड वर्षांनी आलेल्यांना मुंबई बदलेली पाहायला मिळते. अण्णाभाऊ साठेंनी जी व्यथा मुंबईत अनुभवली, ती व्यथा कुणाच्या वाट्याला येऊ नये असा प्रयत्न आपण करतो. म्हणून अण्णाभाऊ साठेंची एक कविता आहे, मुंबईवर. त्यांनी काय अनुभवलं'. 'याच कवितेमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची नांदी केलेली आहे. ही कविता वाचण्याचं कारण एवढंच आहे की, चार महिन्यांनंतर भाषणं सुरू होतील महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे', असा टोला देखील फडणवीसांनी विरोधकांना लगावला. 

हेही वाचा: Today's Horoscope: 'या' राशीची आर्थिक स्थिती आज मित्रांच्या कृपेने उजळणार

'मुंबई महाराष्ट्राचीच आहे' - फडणवीस 

'आताच सांगतो. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही. कुणाचा बाप, बापाचा बाप, किंवा त्याचा आजोबा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे, मुंबई महाराष्ट्राचीच राहील आणि हजारो पिढ्या राहील. मुंबईत आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील', असं वक्तव्य फडणवीसांनी विधानसभेत केले. 


सम्बन्धित सामग्री