बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अनेक मोर्चे काढण्यात आले. देशमुख कुटुंबाने देखील प्रत्येक मोर्च्यात सहभागी होईन न्यायासाठी दाद मागितली. या प्रकरणी अनेक राजकीय नेत्यांनी देखील आपली मत मांडली. आमदार सुरेश धस यांनी तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर जोरदार निशाणा साधला. अशातच आता या सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय.
संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण करु नये, देशमुख कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही त्याचबरोबर हा राजकारणाचा विषयच नाही असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय.
हेही वाचा: 'आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरे यांना सोडून जातील'
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे:
'संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण करु नये'
'देशमुख कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'
हा राजकारणाचा विषयच नाही - सुळे
'अन्नत्याग करू नका, तुमची लढाई आम्ही लढू'
सुप्रिया सुळेंचं ग्रामस्थांना आवाहन
बीडमधील गुंडगिरी थांबली पाहिजे - सुळे
देशमुख हत्या आणि सुळेंची भूमिका:
वाल्मिक कराडच्या मागे ईडी कशी लागली नाही?
वाल्मिक कराडची मस्ती कुणाच्या जीवावर?
कराड खंडणी मागत होता तर कारवाई का झाली नाही?
आता ही लढाई महिलांनी हाती घ्यायला हवी
मी कुणाला भेटणार नाही, तडजोड करणार नाही
बीडमधली गुंडगिरी थांबली पाहिजे
सरकारकडून प्रत्येक दिवसाच्या कारवाईचा आढावा घेणार
सातही आरोपींचा सीडीआर मिळाला पाहिजे
तत्कालीन एसपी, डीवायएसपींचे सीडीआर काढा
आरोपी कृष्णा आंधळेला अटक कधी?
आमचा फोन ट्रॅप होतो, आंधळेचा फोन ट्रॅप का होत नाही?
हेही वाचा: सहाव्या राज्य वित्त आयोग स्थापनेस मान्यता
देशमुख हत्या आणि संजय राऊतांची भूमिका:
'मस्साजोग ग्रामस्थांचा आवाज ऐकला नाही, सरकार मूकबधिर झालंय'
मुख्यमंत्र्यांना कोणाला तरी वाचावयचं आहे.
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
'धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा'