Monday, September 01, 2025 08:03:57 AM

वादळी वाऱ्यामुळे कोसळली भिंत; दोन महिलांचा मृत्यू अन् 5 जण जखमी

छत्रपती संभाजीनगरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वादळी वाऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळली.

वादळी वाऱ्यामुळे कोसळली भिंत दोन महिलांचा मृत्यू अन् 5 जण जखमी

विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वादळी वाऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळली. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे, त्यासोबतच 5 जण जखमी झाले आहेत. सिद्धार्थ उद्यानाच्या भिंतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश महापालिकेने तीनदा दिले होते. मात्र, महापालिकेच्या आदेशाला कंत्राटदाराने केराची टोपली दिली, ज्यामुळे 2 महिलांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा: भीषण वादळामुळे इंडिगो विमानाचे हवेत हेलकावे; प्रवाशांचा थरकाप

माहितीनुसार, या दोन्ही महिला उद्यानात कर्मचारी होत्या. स्वाती खैरनाथ,(वय: 35, रा. रांजणगाव, मुळगाव: लासलगाव) आणि रेखा गायकवाड (वय: 38, रा. सौभाग्य चौक, एन-11 हुडको, छ. संभाजीनगर) असं मयत झालेल्या महिलांची नावे आहेत. पालकमंत्री यांच्या मदतीने मृतांना पाच लाखांची मदत करण्यात आली आहे. तसेच, पुढील सात दिवस सिद्धार्थ उद्यान नागरिकांसाठी बंद राहणार आहे. 

हेही वाचा: चुकीचे मित्रप्रेम पडले महागात; मुलीवरून वाद झाल्याने युवकाचे अपहरण


सम्बन्धित सामग्री