महाराष्ट्र: आज छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती. याच पार्शवभूमीवर संपूर्ण देशभरात त्याच बरोबर महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळतंय. दरम्यान शिवनेरी किल्ल्यावर आकर्षक अशी सजावट करण्यात आली असू संपूर्ण किल्ल्याला फुलांनी सजवण्यात आलेय. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या पाळण्याला देखील आकर्षक अशी सजावट करण्यात आलीय. यावेळी शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी आणि महत्वाची घोषणा केलीय.
हेही वाचा: chhatrapati shivaji maharaj jayanti 2025 : जाणून घ्या: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील व्यवहार
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
शिवाजी महाराज यांचे किल्ले हे आमच्यासाठी मंदिरासारखे आहेत. त्या किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवजन्मोत्सवासाठी आलेल्या नागरिकांना संबोधन करताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. आजपासून 5 वर्षांनी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची 400 वी जयंती साजरी करणार आहोत. किल्ले शिवनेरी किल्ल्यावर आल्यावर स्वराज्याची स्फुर्ती, तेज मिळते. हेच तेज आणि स्फुर्ती घेऊन आम्ही महाराष्ट्राची सेवा करत असतो.
आता तीच स्फुर्ती घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, असं फडणवीस म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिल्यांदा भारताचा आत्मभिमान जागवण्याचा काम केलं. आज १४० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाचा आत्मभिमानामागे शिवाजी महाराज यांची प्रेरणा आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्यदैवत असल्याचं फडणवीस म्हणाले.
महाराजांनी राजकारभार कसा चालवायचं हे सांगितलंय. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ युद्धे नव्हते तर एक उत्तम प्रशासकदेखील होते. पर्यावरण संवर्धन, जल संवर्धन आणि इतर व्यवस्थापनाचे जनक शिवाजी महाराज होते. त्यामुळे त्यांना आदर्श राजा, जाणता राजा म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या रयतेला सर्व दिल्याने आपण त्यांचे स्मरण कायम करत असतो असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.