Sunday, August 31, 2025 02:20:32 PM

उद्योजक लड्डांच्या घरी झालेल्या दरोड्यात आणखी चौघांना अटक

उद्योजक संतोष लड्डांच्या घरी दरोडा घालण्यात आला होता. या प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. नांदेडमधील सोने व्यापाऱ्यासह अंबाजोगाईतील दोघांना अटक केली आहे.

उद्योजक लड्डांच्या घरी झालेल्या दरोड्यात आणखी चौघांना अटक

छत्रपती संभाजीनगर : उद्योजक संतोष लड्डांच्या घरी दरोडा घालण्यात आला होता. या प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. नांदेडमधील सोने व्यापाऱ्यासह अंबाजोगाईतील दोघांना अटक केली आहे. 

उद्योजक लड्डा यांच्या बंगल्यावरील दरोडा प्रकरणी नांदेड येथून सराफासह चार जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. या चौघांकडून 19 तोळे चार ग्राम सोने हस्तगत केले आहे. त्यांची किंमत वीस लाख रुपये असल्याची माहिती आहे. आशिष बाकलीवाल, शेख शाहरुख, शेख अबुजर, शेख सोहेल अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी दरोड्यातील वीस तोळे सोने वितळून त्याची लगड बनवली होती. ते सोने नांदेड येथे विकले होते. या प्रकरणाला 21 दिवस उलटले असून साडेपाच किलोच्या सोन्यापैकी केवळ 51 तोळे सोनेचं पोलिसांना हस्तगत करण्यात यश आले आहे. दरम्यान एन्काऊंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला गुन्हे शाखेने नोटीस बजावत कुटुंबियांचे आधार कार्ड जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्याच्या बहिणीने आधार कार्ड जमा केले.

हेही वाचा: Chenab Bridge Inauguration: पंतप्रधानांच्या हस्ते जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचं उद्घाटन होणार

नेमकं प्रकरण काय? 
छत्रपती संभाजीनगरमधील वाळूजमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी मोठा दरोडा पडला होता. या दरोड्यातील एका संशयित आरोपीचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. अमोल खोतकर असं त्याचं नाव आहे. या दरोड्यात साडेपाच किलोचे सोने चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

दरोड्याच्या घटनेतील मुख्य आरोपी अमोल खोतकर याने गोळीबाराचा प्रयत्न केला. उत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला त्यात खोतकरचा एन्काउंटर झाला असे पोलिसांकडून सांगण्यात आले. अमोल खोतकर गर्लफ्रेंडसोबत एका हॉटेलमध्ये येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  वडगाव कोल्हाटी परिसरामध्ये रात्री खोतकर कार घेऊन आला. त्यावेळी समोरच त्याने पोलिसांना पाहिले. त्यानंतर खोतकरने गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनीही गोळीबार केला. त्यात अमोल खोतकरचा एन्काउंटर झाला असे पोलिसांनी सांगितले.  


सम्बन्धित सामग्री