पुणे : पुणे पोलिसांकडून गजा मारणेला अटक करण्यात आली आहे. शहरातील कोथरुड परिसरात शिवजयंतीच्या दिवशी मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्ती असलेले देवेंद्र जोग यांना मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. कुख्यात गजा मारणेला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. कालपासून 74 ठिकाणी त्याचा शोध घेतला आहे.
गजाननचा कसा झाला 'गजा' ?
जमीन मालक आणि बिल्डर यांच्यातील दुवा म्हणून गजा मारणे काम करायचा. अनेक जमीन खरेदीविक्री प्रकरणात गजा मारणेचा हस्तक्षेप असल्याचे समोर आले आहे. एजंटसारखी गजा मारणेची टक्केवारी ठरलेली होती. यातून गजा मारणेचा वर्चस्ववाद वाढत गेला. पुढे जाऊन नीलेश घायवळ, गजा मारणे यांच्या टोळ्या तयार झाल्या. टोळ्यांच्या वर्चस्वामुळे खुनाच्या अनेक घटना घडल्या. पप्पू गावडे, अमोल बधे हत्येप्रकरणात गजा मारणे आरोपी आहे. पुराव्याअभावी गजा मारणे आणि साथीदारांची सुटका झाली.
हेही वाचा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या अडचणी वाढणार?, नरेंद्राचार्य महाराजांबद्दल केले अपमानास्पद वक्तव्य
पुण्यातील कोथरुड परिसरात शिवजयंतीच्या दिवशी मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्ती असलेले देवेंद्र जोग यांना मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती, हे सर्व आरोपी गज्या मारणे गँगशी संबंधित आहेत. पुणे पोलिसांकडून पाचव्यांदा मकोका कायद्याअंतर्गत गजा मारणे गँगवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी केले्या कारवाया तोंडदेखलेपणाच्या ठरल्या आहेत. त्यामुळे पोलीस पुन्हा कारवाई करत आहेत.
केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळच्या व्यक्तीला मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केली होती. त्यानंतर मारहाण करणाऱ्या चारपैकी तिघांना अटक करुन पोलीसांनी त्यांची धींड काढली. त्यानंतर मारणे टोळीवर मकोको कायद्याअंतर्गत कारवाई सुरु करण्यात आली. यापूर्वी तीन आरोपींना अटक केली होती, तर आणखी दोन आरोपी फरार आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणात फरार असलेल्या गजा मारणेला आम्ही अटक केली अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त संभाजी कदम यांनी दिली. याप्रकरणात गजा मारण्याची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल.
पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये बुधवारी शिवजयंती दिवशी दुचाकीस्वार अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला कुख्यात गुंड गजा मारणेच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना समोर आली होती. मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देवेंद्र जोग यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. तसेच पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. पुणे पोलीस डोळे बंद करुन बसलेत का? अशा भाषेत मोहोळ यांनी पोलिसांचा समाचार घेतला होता. मंत्री मोहोळ यांच्या इशाऱ्यानंतर पुणे पोलिसांच्या कारवाईला वेग आला. त्यानुसार आज गज्या मारणेला अटक करण्यात आली असून मकोका अंतर्गत कारवाई सुरू आहे.